एलियनचा माणसांवर हल्ला!! गोळ्या घालूनही काहीच फरक पडला नाही; कुठे घडली घटना?

टाइम्स मराठी । या जगात सर्वात मोठे रहस्य कोणतं हे विचारलं तर एलियन (Aliens) हे नाव समोर येईल. या जगामध्ये एलियन आहेत का नाही याबाबत बरेच प्रश्न आणि उत्तरे समोर येतात. यासोबतच एलियन बद्दल बऱ्याच अफवा देखील पसरवल्या जातात. या एलियन मुळे वादविवाद देखील झालेले आहेत. त्यानुसारच आता एलियन बाबत नवीन घटना उघड झाली आहे. काही लोकांवर एलियनने हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

   

दक्षिण अमेरिका येथील पेरूमध्ये काही लोकांनी एलियन्स पाहिल्याचा दावा केला. त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त एलियनच पाहिलेच नाही तर एका एलियन ने त्यांच्यावर हल्ला देखील केला. यावेळी त्यांना एलियन म्हणजे कोण असा विचारण्यात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या ग्रहावरून आलेले लोक म्हणजेच एलियन पाहिले आहे असं सांगितलं. या देशांमध्ये असलेल्या एका महिलेवर एलियन्स ने हल्ला करून चेहरा ओरबाडल्याचं सांगण्यात येत आहे.

बंदुकीच्या गोळ्या झाडूनही परिणाम शून्य –

पेरू येथील लोरेटो भागामध्ये ही घटना घडली असून त्या ठिकाणी राहणाऱ्या गावकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती भरली आहे. या ग्रामस्थांनी सांगितलं की, हिरव्या रंगाच्या सात फूट उंचीच्या एलीयन ने त्यांच्यावर हल्ला केला. या एलियन चे डोळे पिवळ्या रंगाचे होते. या एलियन्स वर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या तरी त्यांच्यावर काहीच परिणाम पडत नसल्याचे देखील त्यांनी सांगितलं. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दोनदा गोळ्या झाडल्या पण त्याला काहीच झालं नाही असं सांगण्यात येत आहे.

पण सत्य काही वेगळंच आहे –

रात्री घडलेल्या या घटनेचा तपास करण्यासाठी संपूर्ण परिसरामध्ये सकाळी शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर काही तासातच पोलिसांना घडलेल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती आणि या घटनेची सत्यता समजली आहे. तपासा वेळी पोलिसांना या जंगलाच्या मध्यभागी एक वेअर हाऊस आढळून आले. या वेअर हाऊसच्या तार या अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर उत्खनन याच्याशी जोडलेल्या आढळल्या. त्याचबरोबर ड्रग्स आणि खान माफीया गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी हे नाटक करत होते. हे माफीया जेट टॅक्स सूटचा वापर करून डेंजर मेकअप करून हवेत उडत होते. अंधार असल्यामुळे आणि जंगलातील झाडांमुळे त्यांना हे लोक एलियन सारखेच दिसत होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते आणि या घटनेचा तपास केल्या नंतर अजूनही ग्रामीण लोक हे घाबरलेल्या अवस्थेत आहेत. घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये लष्कर तैनात करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.