एलियन्ससारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म; Video पाहून तुम्हीही चक्रव्हाल

टाइम्स मराठी | एखादी महिला जेव्हा आई बनते, तेव्हा तिचा दुसरा जन्म असल्याचं मानला जातो. त्याचबरोबर प्रत्येक आईला तिचे मूल निरोगी आणि सुदृढ जन्माला यावं अशी इच्छा असते. जन्म देणारी आई तिच्या लेकराला जन्म देण्यासाठी प्रचंड वेदना सहन करते. परंतु जेव्हा जन्मलेल्या बाळाला एखाद्या विचित्र आजार झालेला असेल तेव्हा सर्वात जास्त त्रास आईला होत असतो. आजकाल टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की, बाळाला काही आजार असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर चाचण्यांच्या माध्यमातून लगेच कळतं. परंतु असे बरेच रोग आहे ज्याचे निदान बाळ जन्माला आल्यानंतर समजते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेने एलियन्स सारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

   

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका आईने चिमुकल्याला जन्म दिला. परंतु हे बाळ नॉर्मल नसून बाळ एलियन सारखे दिसत आहे. यामुळे डॉक्टर आणि आई दोघांना देखील धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये बाळाचा चेहराच नाहीतर संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगांमध्ये दिसत आहे. आणि या सोबतच संपूर्ण शरीरावर क्रॅक्स देखील दिसत आहेत. या बाळाचे डोळे आणि तोंड लाल असून हे बाळ पूर्णपणे एलियन सारखे दिसत आहे. त्याचबरोबर या बाळाच्या डोक्यावर केस देखील दिसत नाही.

बाळाला झाला आहे हा रोग

एलियन सारखा दिसणारं हे बाळ पूर्णपणे तोंड बंद सुद्धा करू शकत नाही आणि डोळे देखील उघडू शकत नाही. या मुलाला दुर्मिळ असा आजार झालेला आहे. या आजाराचं नाव हर्लेक्वीन इचथायोसिस आहे. हा अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये त्वचेवर वाईट परिणाम दिसून येतो. हे बाळ अकाली जन्मलेली असतात. या बाळाचं शरीर बऱ्याच ठिकाणी जाड आणि कडक त्वचेने झाकलेले असते. त्याचबरोबर सिमेंटला पडल्याप्रमाणे क्रॅक देखील बाळाच्या शरीरावर दिसतात. आणि टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली असली तरीही आश्चर्याची बाब म्हणजे या आजारावर कोणताही उपचार होऊ शकत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी देखील हैराण झाले आहेत. या बाळाला नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्हिडिओवर 1315 लाईक्स आलेले असून kbkonline या यूजर आयडी वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.