शुक्र ग्रहावर एलिअन्सचे अस्तित्व; NASA शास्त्रज्ञाच्या दाव्याने खळबळ

टाइम्स मराठी । आपल्याला अनेकवेळा एलियन बद्दल बातम्या ऐकायला मिळत असतात. एलियन या विषयावर भरपूर चित्रपट देखील बनले आहेत. एलियन हा विषय आपल्यासाठी नेहमीच कुतूहलाचा राहिलेला आहे. आणि आपल्या मनात एलियन बद्दल अनेक प्रकारचे प्रश्न देखील निर्माण होतात. आता अशातच नेशनल एयरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या एका वैज्ञानिकाने असा दावा केला आहे की, सौलर सिस्टममध्ये एलियनचे अस्तित्व असून शुक्र (Venus Planet) या ग्रहावर एलियन असल्याची शक्यता आहे.

   

डेलीमेल च्या रिपोर्टनुसार हा दावा नासाचे वैज्ञानिक डॉक्टर मिशेल थेलर यांनी केला आहे. डॉक्टर थेलर हे अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर येथे एक रिसर्च साइंटिस्ट आहेत. मोठ्या मजबुतीने केलेल्या ह्या दाव्यात डॉक्टर थेलर म्हणतात की, शुक्र ग्रहावर कार्बन डाइऑक्साइड ने भरलेल्या वातावरणात जीवनाचे संभावित संकेत मिळाले आहेत. कुठेतरी एलियन नक्कीच अस्तित्वात आहेत असे देखील त्यांनी सांगितले. शुक्र या ग्रहावर 475°C (900°F) तापमान आहे. एलियन असल्याचा दावा करणारे डॉक्टर थेलर इंटरव्यू मध्ये म्हणाले की, शुक्राच्या वातावरणात जीवनाचे संभावित संकेत दिसून येतात. याचबरोबर डॉक्टर असेही म्हणाले की, शुक्राचे वातावरण पाहून असे दिसून येते की , जसे हे बैक्टीरिया द्वारा निर्मित आहे.

पृथ्वीचा जुळा ग्रह शुक्र

शुक्र हा पृथ्वीच्या समान आकार आणि द्रव्यमान ग्रह आहे. म्हणूनच त्याला अनेकदा पृथ्वीचा जुळा ग्रह असे देखील म्हटले जाते. शुक्र ग्रहाचा आकार पृथ्वी सारखा असला तरीही शुक्र ग्रहावरचे वातावरण आणि पृथ्वीवरचे वातावरण दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. शुक्राचे तापमान 867°F (464°C) असून , दबाव पृथ्वीपेक्षा 92 पट अधिक आहे. शुक्राच्या वातावरणात ९६ टक्के कार्बन डाइऑक्साइड आहे. शुक्र या ग्रहाबद्दल विशेषबाब म्हणजे हा ग्रह सल्फ्यूरिक एसिड असलेल्या ढगांनी घेरलेला आहे. यामुळे शुक्राचे पृष्ठभाग पाहणे अशक्य आहे. यामुळेच ऍस्ट्रोनॉमर्स यांचा म्हणणं आहे की शुक्र ग्रहावर मनुष्यांचा अस्तित्व असणे अशक्य असून शुक्र हा ग्रह सौर मंडळातील सर्वात गरम ग्रह आहे. शुक्र ग्रहावरील तापमानामध्ये काच देखील विरघळू शकते. त्यामुळे डॉक्टर मिशेल थेलर यांनी केलेला दावा किती खरा आणि किती खोटा हे समजणे कठीण आहे.