Amazfit Balance Smartwatch भारतात लॉन्च; तुमच्या आरोग्यावर ठेवेल बारीक लक्ष

Amazfit Balance Smartwatch । Amazfit या पॉप्युलर ब्रॅडने भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. Amazfit Balance असे या स्मार्टवॉच चे नाव असून हे स्मार्टवॉच बॉडी सोबतच मेंदूवर सुद्धा लक्ष ठेवते. Amazfit Balance हे स्मार्टवॉच कंपनीने आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी डिझाईन केलं आहे. यामध्ये बरेच फीचर्स उपलब्ध करण्यात आले असून सनसेट ग्रे आणि मीडनाईट कलर ऑप्शन मध्ये मिळते. या स्मार्टवॉचची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  तुम्ही देखील ही स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 4 डिसेंबर पासून अमेझफिट इंडियाच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टवॉच चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन- Amazfit Balance Smartwatch

Amazfit Balance या स्मार्टवॉच मध्ये 1.5 इंच चा AMOLED डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 480 × 480 पिक्सल रिझोल्युशन आणि 60 hz रिफ्रेश रेट, 600 Nits पीक ब्राईटनेस ऑफर करतो. हे स्मार्टवॉच Zepp OS 3.0  वर काम करते. या वॉच मध्ये कंपनीने 475 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर 14 दिवसांपर्यंत चालते. यासोबतच सेवर मोड मध्ये ही बॅटरी 25 दिवसापर्यंत चालते.

फिचर्स

Amazfit Balance Smartwatch मध्ये बरेच हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स मिळतात. यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंग, स्लिप मॉनिटरिंग, यासारखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच अपग्रेडेड ड्युअल LED आणि 8PD बायोट्रॅकर 5.0  PPG बायोमेट्रिक ऑप्टिकल सेंसर ला इंटिग्रेट करण्यासाठी आणि मेंटल रिकव्हरी इंडिकेटर्स चे आकलन करण्यासाठी काही फंक्शन्स देखील मिळतात.

नवीन रेडीनेस फीचर

Amazfit Balance Smartwatch मध्ये नवीन रेडीनेस फीचर देण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला जर रोज सकाळी एक स्कोर मिळतो. या स्कोरच्या माध्यमातून युजर्सला स्पेसिफिक स्लिप इंडिकेटर मानसिक आणि शारीरिक स्थितीवर कशा पद्धतीने परिणाम करू शकतात हे समजते. हे फीचर Zepp OS 3.0 वर काम करते. यामध्ये जेप कोच देखील देण्यात आले आहे. जेणेकरून युजर्सच्या क्षमतेनुसार पर्सनलाईज ट्रेनिंग प्लॅन्स दिले जातात. एवढेच नाही तर युजर्स जेप कोच एआय चॅट फीचर देखील वापरू शकतात. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला स्पोर्ट संबंधित प्रश्नांचे उत्तर मिळतील. प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आणि इंटरॅक्टिव्ह  कोचिंग प्रदान करण्यासाठी या स्मार्टवॉच मध्ये जनरेटिव्ह AI आणि लॅंग्वेज मॉडेलचा वापर करण्यात आला आहे.

नवीन कंपोझिशन मॅनेजमेंट फीचर

Amazfit Balance या स्मार्टवॉच मध्ये नवीन कंपोझिशन मॅनेजमेंट फीचर देखील देण्यात आले आहे. जेणेकरून युजर्सला  शरीरातील फॅट परसेंटेज, स्केलेटल मसल्स, मसल्स, वॉटर, बोन मास, प्रोटीन, BMI, बेसल मेटाबॉलिझम यासारख्या पॅरामीटर्स बद्दल माहिती मिळेल. या स्मार्टवॉच मध्ये ब्लूटूथ कॉलिंग साठी माईक आणि स्पीकर सोबतच अमेजन अलेक्सा व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील मिळतो. Amazfit Balance या स्मार्टवॉच मध्ये  4G, GPS, 5ATM वॉटर रजिस्टंट रेटिंग, स्मार्ट ॲप नोटिफिकेशन  यासारखे बरेच फीचर्स मिळतात.