Amazfit Cheetah AI स्मार्टवॉच लाँच; सिंगल चार्जवर 14 दिवस चालणार, किंमत किती?

टाइम्स मराठी ।भारतामध्ये Amazfit Cheetah सिरीजचे स्मार्टवॉच लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीने लॉन्च केलेले हे वॉच २ वेगवेगळ्या साईजच्या डायल मध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी पहिले मॉडेल Amazfit Cheetah राऊंड डायलमध्ये उपलब्ध करण्यात आले असून दुसरे मॉडेल स्क्वेअर मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या स्मार्टवॉच चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तरपणे …

   

स्पेसिफिकेशन-

Amazfit Cheetah round मध्ये 1.39 इंच HD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 454×454 पिक्सेल रिझोल्युशन सह येत असून 1000 नीट्स ब्राईटनेस देतो. या स्मार्टवॉच मध्ये 150 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहे. तर दुसरीकडे Amazfit Cheetah square मॉडेलमध्ये 1.75 इंच HD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्ट वॉच मध्ये देखील150 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहे.

फीचर

Amazfit Cheetah round आणि Amazfit Cheetah square दोन्ही स्मार्ट वॉच मध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, टेन्शन मॉनिटरिंग, यासारखे फीचर्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्मार्ट वॉच मध्ये 470 गाणे स्टोअर करता येऊ शकतात. आणि हे गाणे ब्लूटथच्या माध्यमातून ऐकता देखील येऊ शकतात.

बॅटरी

Amazfit Cheetah round आणि Amazfit Cheetah square या दोन्ही स्मार्टवॉचच्या बॅटरी लाईफ बद्दल बोलायचं झालं तर, Amazfit चिताह राऊंड हे मॉडेल एकदा चार्ज केल्यानंतर 14 दिवसांपर्यंत चालते. म्हणजेच हे मॉडेल 14 दिवस चार्ज करण्याची गरज भासत नाही. आणि Amazfit चिता स्क्वेअर हे मॉडेल एकदा चार्ज केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत चालते. 7 दिवसानंतर हे मॉडेल चार्ज करावे लागते.

किंमत किती ?

Amazfit Cheetah round आणि Amazfit Cheetah square दोन्ही स्मार्टवॉच च्या किमती भारतामध्ये 20,000 रुपये एवढी आहे. Amazfit चिता सिरीज भारतामध्ये ग्रे कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही स्मार्टवॉच भारतात 24 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.