Amazon Flipkart Sale : मोबाईलचं नव्हे तर Amazon- Flipkart सेलमध्ये ‘या’ वस्तूंवर सुद्धा बंपर सूट

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण देशात सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी सेल (Amazon Flipkart Sale) आणला आहे. ८ ऑक्टोबर पासून हा सेल सुरु झाला असून 16 ऑक्टोंबर पर्यत असणार आहे. त्यामुळे स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची मोठी संधी ग्राहकांना आहे. या सेलमध्ये मोबाईल शिवाय, TV, हेडफोन,लॅपटॉप या वस्तूंवर सुद्धा तुम्हाला बंपर सूट मिळत आहे. चला तर याबाबत सविस्त जाणूनच घेऊया.

   

मॅकबुक-

जर तुम्ही मॅकबुक खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला या सेलच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकते.  लॅपटॉप हा प्रत्येक गोष्टीसाठी गरजेचा झाला आहे. वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑफिशियल वर्क असेल, ते लॅपटॉप शिवाय होणे शक्य नाही. अशावेळी  लॅपटॉप कितीही महाग असला तरीही तुम्हाला तो घ्यावाच लागतो.  परंतु आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या सेलच्या (Amazon Flipkart Sale) माध्यमातून तुम्ही लॅपटॉप कमी किमतीमध्ये डिस्काउंट ऑफर नुसार खरेदी करू शकतात. त्यानुसार तुम्ही Apple कंपनीचा 13 inch MacBook Air with the m2 chip खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला या सेलमध्ये एक लाख रुपयांच्या आसपास हा मॅकबुक मिळू शकतो. Apple च्या या मॅकबुक मध्ये  ग्लास ट्रेकपॅड, 1080 पिक्सेल वेब कॅमेरा, मैगसेफ चार्जर, यासारखे फीचर्स उपलब्ध आहे. जर तुम्हाला एक लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मॅकबुक खरेदी करायचा असेल तर  Apple MacBook Air M1 तुम्हाला 70 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. आणि तुमचे लॅपटॉप घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते.

हेडफोन- Amazon Flipkart Sale

जर तुम्हाला कमी किमतीमध्ये स्वस्त असे हेडफोन हवे असतील तर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला काही हेडफोन्स वर  डिस्काउंट मिळू शकतो. त्यानुसार या सेलमध्ये Airpods 2nd generation देखील उपलब्ध आहे. याची किंमत 11,999 एवढी आहे. परंतु तुम्ही सेलच्या माध्यमातून 8,999 मध्ये खरेदी करू शकतात. त्याचबरोबर  Sony’s WH 1000XM4 आणि WH 1000XM5 यावर देखील डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे. त्यानुसार तुम्ही 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात.

Smart TV –

प्रत्येक जण Smart TV खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असतात. बऱ्याच जणांच्या घरी Smart TV उपलब्ध आहे. परंतु बरेच जण असे आहेत की, बजेट नसल्यामुळे  त्यांना Smart TV खरेदी करता येत नाही. अशा व्यक्तींसाठी (Amazon Flipkart Sale) फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या सेलमध्ये Smart TV वर देखील डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. या सेलमध्ये हाय क्वालिटीचे, ब्रँडेड Smart TV वर डिस्काउंट उपलब्ध आहे. यामध्ये Samsung , Sony , LG हे ब्रँड देखील उपलब्ध आहे. तुम्हाला या सेलमध्ये डिस्काउंट ऑफरनुसार Smart TV 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतात.