Amazon Great Freedom Festival Sale 2023 आजपासून सुरु; या Mobiles वर बंपर सूट

Amazon Great Freedom Festival Sale 2023 । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ॲमेझॉन ओळखलं जाते . अमेझॉन नेहमी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंवर बंपर सूट देऊन ग्राहकांना खरेदीची संधी देत असते. यापूर्वी 15 जुलैला अमेझॉन प्राईम डे सेल सुरू केला होता. यावेळी ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट, बँक ऑफर देण्यात आल्या होत्या. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, अप्लायन्सेज, होम, किचन, फर्निचर, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट या सर्व वस्तूंवर शानदार सूट देण्यात आली होती. जर तुम्हाला या सेलचा फायदा घेता आला नसेल तर कंपनीने पुन्हा एक सेल ग्राहकांसाठी आयोजित केला आहे. या सेलचे नाव ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल आहे.

   

ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल हा सेल (Amazon Great Freedom Festival Sale 2023) आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट पासून सुरू होणार असून 8 ऑगस्टपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स वर डिस्काउंट देण्यात येणार आहेत. हा सेल पाच दिवस असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना बँक ऑफर्स सह नो कॉस्ट ईएमआय आणि डिस्काउंट कूपन देण्यात येणार आहे. ऍमेझॉनच्या या सेलमध्ये iQOO Neo 7 pro 5G, Realme Narzo 60 आणि Realme Narzo N55 या ३ मोबाईल वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. चला ही ऑफर नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया.

iQOO Neo 7 pro 5G

iQOO Neo 7 pro 5G

iQOO Neo 7 pro 5G या स्मार्टफोनची किंमत 34 हजार 999 रुपये असून जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला यावर ॲमेझॉन सेल मध्ये डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन आयसीआयसीआय बँक कार्ड च्या माध्यमातून खरेदी केला तर तुम्हाला 2000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देण्यात येईल. यासोबतच हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट कूपन देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन या सेलमध्ये नऊ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय वर देखील उपलब्ध आहे. iQOO Neo 7 pro 5G हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह मिळतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP तर अल्ट्रा वाईड अँगल लेस कॅमेरा 8 MP उपलब्ध असून 2 MP मायक्रो लेंस कॅमेरा आणि 16 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये Qualcomn Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 6.78 इंच च्या फुल एचडी आणि AMOLED डिस्प्ले सह 120 Hz रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 वर बेस्ड Funtouch OS 13 देण्यात आले असून 256 GB स्टोरेज आणि 12 GB Ram देण्यात आली आहे.

Realme Narzo 60

Realme Narzo 60– (Amazon Great Freedom Festival Sale 2023)

Realme Narzo 60 हा स्मार्टफोन देखील अमेझॉन प्राईम सेल मध्ये परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. याची किंमत 17,999 एवढी असून या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये मिळतो. जर तुम्ही हा स्मार्टफोन या सेलमध्ये खरेदी करू इच्छित असाल तर यावर तुम्हाला हजार रुपयांचे डिस्काउंट कूपन देण्यात येईल. सहा महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय देखील ऑफर केला जात आहे. Realme Narzo 60 स्मार्टफोनमध्ये 5000MAH बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी 67W SuperVOOC फार्स्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये 6.43 इंच फुल एचडी सुपर AMOLED कर डिस्प्ले देण्यात आलेला असून हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. Realme Narzo 60 या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज, आणि 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज व्हेरियंट देण्यात आलेले आहे.

Realme Narzo N55

Realme Narzo N55

Realme Narzo N55 या स्मार्टफोनमध्ये mediatek Helio G88 soC प्रोसेसर देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन Narzo ची पहिली N सिरीज आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलेले असून याची किंमत 10,999 एवढी आहे.आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंट ची किंमत 12,999 रुपये आहे. यामध्ये 6.72 इंच चा FHD + डिस्प्ले देण्यात आलेला असून 90 hz रिफ्रेश रेट सह हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 MP कॅमेरा सेटअप सह उपलब्ध आहे. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर अमेझॉन सेल मध्ये तुम्हाला 1000 रुपये डिस्काउंट कूपन मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर नो कॉस्ट ईएमआय देखील मिळू शकेल.