Amazon Great Indian Festival 2023 : ‘या’ वस्तूंवर मिळणार बंपर सूट; खरेदीची संधी सोडू नका

Amazon Great Indian Festival 2023 । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून Amazon ओळखलं जाते. ग्राहकांना कमी पैशात घरबसल्या वस्तू किंवा कोणतीही गोष्ट देण्याचा Amazon चा प्रयत्न असतो. त्याच पार्श्वभूमीवर लवकरच आता Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येणार आहे. Amazon Great Indian Festival 2023 सेल हा येत्या ऑक्टोबरच्या च्या पहिल्या आठवड्या पासून सुरु होऊ शकतो
या सेलमध्ये अनेक वस्तूंवर बंपर सूट देण्यात येणार आहे.

   

Amazon च्या या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट, बँक ऑफर देण्यात येणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, अप्लायन्सेज, होम, किचन, फर्निचर, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट या सर्व वस्तूंवर शानदार सूट देण्यात येणार आहे. ॲमेझॉन च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये स्मार्ट टीव्ही, अप्लायन्सेन्सवर 75% पर्यंत सूट देण्यात येणार आहे.

Mobile वर मिळणार 40% पर्यंत सूट– Amazon Great Indian Festival 2023

एवढेच नाही तर या सेल मध्ये मोबाईल वर सुद्धा मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफरचा लाभ घेता येणार आहे. Amazon Great Indian Festival 2023 सेल मध्ये सेलच्या माध्यमातून स्मार्टफोनवर 40% पर्यंत सूट देण्यात येणार आहे. यामध्ये iPhone 13, Samsung galaxy m34 5g , Oneplus nord ce 3 5g आणि oneplus 11 हे स्मार्टफोन देखील उपलब्ध आहे. तुम्ही हे स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहेत. जर तुम्ही यातील कोणताही स्मार्टफोन अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मधून खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला सेलच्या माध्यमातून बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर्स देण्यात येणार आहे. याशिवाय जर तुम्ही स्मार्टफोन SBI बँकेच्या कार्डच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट देण्यात येणार आहे.

याशिवाय, अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये Samsung Galaxy M34 5G, Tecno Pova 5 Pro 5G, Oppo A78 5G, OnePlus Nord CE 3 Lite 5G, iQOO Z7s , Lava Blaze 5G , Redmi 12 5G, iQOO Z6 Lite, Redmi 12C , itel A60s या स्मार्टफोन वर देखील बंपर सूट देण्यात येणार आहे. जेणेकरून ग्राहक या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलचा लाभ घेऊ शकतील आणि कमी किमतीमध्ये मोबाईल आणि बाकीचे प्रॉडक्ट खरेदी करू शकतील.