Amazon Great Indian Festival Sale मध्ये ‘या’ Mobile वर मिळतोय 11 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

टाइम्स मराठी । आज म्हणजेच 8 ऑक्टोबर पासून Amazon वर Amazon Great Indian Festival Sale सुरु झाला आहे. या सेलच्या माध्यमातून तब्बल 25000 पेक्षा जास्त सूट देण्यात आली आहे. यामध्ये मोबाईल, TV, फ्रीझ यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. Amazon च्या या सेल मध्ये Honor 90 5G मध्ये 11 हजार रुपयांपर्यंत बंपर सूट देण्यात आली आहे. यामध्ये बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचाही समावेश आहे. त्यामुळे तुम्हीही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका.

   

काय आहे ऑफर? Amazon Great Indian Festival Sale

Honor 90 5G या स्मार्टफोनच्या बेस्ट मॉडेलवर म्हणजेच 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटवर ७ हजार रुपयांचा फेस्टिवल डिस्काउंट उपलब्ध आहे. यासोबतच जर तुम्ही हा स्मार्टफोन SBI कार्डच्या माध्यमातून पेमेंट करून खरेदी करणार असाल तर तुम्हाला या स्मार्टफोनवर आणखीन चार हजार रुपयांची सूट मिळू शकते. त्यानुसार तुम्ही ह्या मोबाईल 26,999 रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर  Honor 90 5G या स्मार्टफोनच्या 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटवर देखील अमेझॉनच्या या सेलमध्ये (Amazon Great Indian Festival Sale) डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे.  या स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 एवढी आहे. परंतु या सेलच्या माध्यमातून या मोबाईल वर 6000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. एवढेच नाही तर SBI कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास चार हजार रुपयांची सूट देखील मिळणार आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन 29 हजार 999 मध्ये खरेदी करू शकता.

Honor 90 5G मध्ये काय खास आहे?

Honor 90 5G या मोबाईलमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1.5 K रिझोल्युशन आणि 120 HZ रिफ्रेश रेट मिळतोय. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 SOC प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड OS 7.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या मोबाईलमध्ये 5000 MAH बॅटरी प्रदान करण्यात आली असून ही बॅटरी 66 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा-

Honor 90 5G या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड अँगल, दोन मेगापिक्सल मायक्रो लेन्स सह LED फ्लॅश युनिट उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये सेल्फीसाठी समोरील बाजूला 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मोबाईलमध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर उपलब्ध करण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Honor 90 5G या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल ब्रँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS, USB टाईप सी यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम + 256 GB इंटरनल स्टोरेज आणि  12 GB रॅम + 512 GB इंटरनल स्टोरेज याप्रमाणे स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे.