Amazon Great Indian Festival Sale : 10 हजारांपेक्षा कमी पैशात मिळतायंत हे मोबाईल

Amazon Great Indian Festival Sale । प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग कंपनी Amazon ने सणासुदीच्या काळात ग्राहकांना खुश करण्यासाठी 8 ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale चालू केला आहे. या सेलच्या माध्यमातून अगदी कमी पैशात तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह कपडे वगैरे सुद्धा खरेदी करण्याची संधी तुम्हाला आहे. Amazon च्या या सेलमध्ये स्मार्टफोनवर सुद्धा बंपर सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी १० हजारांपेक्षा कमी पैशात मिळणारे काही स्मार्टफोन बद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

   
Lava Blaze 5G

Lava Blaze 5G– Amazon Great Indian Festival Sale

Lava Blaze 5G या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच चा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेटसह येत असून यामध्ये मीडियाटेक डायमनसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध करण्यात आली असून ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Lava Blaze 5G मध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा 2 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा, आणि आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये तुम्हाला 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 9,999 मध्ये खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर या स्मार्टफोन वर 250 रुपयांचे कुपन देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही EMI ऑप्शन वर हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 485 रुपयांच्या EMI ऑप्शन नुसार घरी घेऊन जाऊ शकतात.

itel P55 5G

itel P55 5G

itel P55 5G हा स्मार्टफोन 6.6 इंच च्या एचडी + IPS LCD डिस्प्लेमध्ये मिळतोय. हा डिस्प्ले 1612×720 पिक्सेल रिझोल्युशन आणि 90 hz रिफ्रेश रेट सह येतो. itel कंपनीचा हा 5G मोबाईल अँड्रॉइड 13 ओएस वर बेस्ड आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 6080 आफ्टर कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.मोबाईल मध्ये ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल एवढा असून AI लेंस सोबत मिळून हा काम करतो. तर मोबाईलच्या समोरील बाजूला आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी दिली असून बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. हा 12 GB रॅम आणि 228 GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला 5G स्मार्टफोन अमेझॉन वर 9,999 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन EMI ऑप्शन नुसार खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही 485 रुपयांमध्ये हा मोबाईल घरी घेऊन जाऊ शकता.

Samsung Galaxy M14 5G

Samsung Galaxy M14 5G

Samsung Galaxy M14 5G हा मोबाईल 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच चा FHDडिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 hz रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने या मोबाईल मध्ये octacore प्रोसेसर दिला आहे. मोबाईल मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.Samsung Galaxy M14 5G मध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या (Amazon Great Indian Festival Sale) माध्यमातून खरेदी करणार असाल तर 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट तुम्ही 11990 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनवर SBI कार्डधारकांना हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. एवढेच नाही तर तुम्ही 558 रुपयांमध्ये EMI च्या माध्यमातून देखील हा मोबाईल खरेदी करू शकता.