Amazon Great Indian Festival Sale : Motorola चा फोल्डेबल Mobile मिळतोय अगदी स्वस्तात

Amazon Great Indian Festival Sale । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणाऱ्या Amazon वर येत्या ८ ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale सुरु होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या या काळात स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची मोठी संधी ग्राहकांना मिळत आहे. अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलजरी 8 ऑक्टोंबर पासून सुरू होणार असला तरीदेखील प्राईम मेंबरसाठी हा सेल 24 तासांच्या आधीच सुरु होणार आहे. या सेलमध्ये तब्बल 25000 पेक्षा जास्त वस्तुंवर बंपर सूट देण्यात आली आहे.

   

Amazon Great Indian Festival Sale मध्ये बऱ्याच स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यानुसार ग्राहक कमी किमतीमध्ये जबरदस्त मोबाईल खरेदी करू शकतील. अमेझॉनच्या या सेलमध्ये Motorola Razr 40 या फोल्डेबल स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हीही हा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावर देण्यात आलेल्या या डिस्काउंट ऑफर बद्दल नक्कीच जाणून घ्या

काय आहे डिस्काउंट ऑफर

Amazon Great Indian Festival Sale मध्ये Motorola Razr 40 या स्मार्टफोनवर 10,000 रुपयांचा भरभक्कम डिस्काउंट देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या मोबाईलच्या खरेदीवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. खरं तर Motorola Razr 40 या स्मार्टफोनची किंमत भारतात 59,999 रुपये एवढी आहे. परंतु डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून तुम्ही या स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकतात. तसेच बँक ऑफरनुसार तुम्हाला या मोबाईलवर 5,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट सुद्धा मिळत आहे. म्हणजेच तुम्ही अवघ्या 44,999 रुपयांमध्ये हा मोबाईल घरी घेऊन जाऊ शकता.

स्पेसिफिकेशन– Amazon Great Indian Festival Sale

Motorola Razr 40 या मोबाईल मध्ये 165hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स ब्राईटनेस यासह 6.9 इंच फोल्डेबल PoLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर आऊटर साईडने 144hz रिफ्रेश डेट सह 3.6 इंचाचा PoLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं तर प्रायमरी कॅमेरा 12MP आणि अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा 13 MP आणि समोरील बाजूला 32MP सेल्फी कॅमेरा मिळतोय. कंपनीने या मोबाईल मध्ये 3800mAh एवढी बॅटरी दिली असून ही बॅटरी 30w वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

Razr 40 या मोबाईल बद्दल बोलायचं तर अफोर्डेबल फ्लिप फोन आहे. त्यामध्ये 144hz रिफ्रेश रेट, HD + रिझोल्यूशन आणि 6.9 इंचाचा PoLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आऊटर साईडने 1.5 इंचाचा डिस्प्ले आणि snapdragon 7 gen 1 प्रोसेसर यासारखे फिचर यामध्ये आहेत. त्याचबरोबर 64 mp प्रायमरी कॅमेरा, 12 mp अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 32mp फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या मोबाईल मध्ये 4200 mAh बॅटरी असून 30 w फार चार्जिंगला ती सपोर्ट करते.