Amazon Great Indian Festival Sale : 11000 पेक्षा कमी किमतीत मिळतोय Nokia चा Mobile; फीचर्सही आहेत जबरदस्त

टाइम्स मराठी । भारतात सध्या सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी ८ ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूवर तुम्हाला बंपर सूट मिळत आहे आणि ग्राहकांना अगदी स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी यानिमित्ताने मिळत आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट, फॅशन रिलेटेड प्रॉडक्ट यासारख्या बऱ्याच गोष्टींवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या सेलमध्ये Samsung , Vivo , OnePlus , Nokia , Realme यासारख्या ब्रँडच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनच्या या सेलमध्ये नोकियाच्या लेटेस्ट स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. या सेलच्या माध्यमातून Nokia ने नुकताच लॉन्च केलेला  Nokia G42 5G हा मोबाईल तुम्ही 11000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या काय आहे ऑफर..

   

किंमत आणि ऑफर– Amazon Great Indian Festival Sale

Nokia G42 5G हा स्मार्टफोन 11 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये आहे. परंतु अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival Sale) मध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 11999 मध्ये खरेदी करू शकता. त्याचबरोबर या मोबाईल खरेदीवर बँक ऑफर आणि EMI ऑफर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानुसारSBI च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. त्याचबरोबर नो कॉस्ट EMI ऑफर देखील यावर उपलब्ध आहे.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन

Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1612 पिक्सेल रिझोल्युशनसह
90hz रिफ्रेश रेटसह येतो. या मोबाईलची स्क्रीन कॉर्निंग गोरिला ग्लास 3 च्या लेयरने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये Octacore Qualcomn snapdragan 480 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 13  बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम वर आहे. कंपनीकडून मोबाईल सोबत दोन वर्षांसाठी OS अपडेट आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच देण्यात येत आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यात 5000 mAh बॅटरी मिळत असून ही बॅटरी 20 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Nokia G42 5G कॅमेरा सेटअप

Nokia G42 5G या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मोबाईलच्या बॅक पॅनलवर एक रेक्टँग्युलर कॅमेरा मॉडेल देण्यात आले आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, मायक्रो कॅमेरा 2 मेगापिक्सल, वेब सेंसर वाला कॅमेरा 2 मेगापिक्सल आणि समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Nokia G42 5G मध्ये 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम हे दोन ऑप्शन देण्यात आले असून 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.