Amazon Great Indian Festival Sale : 10,000 रुपयांपेक्षा कमी पैशात खरेदी करा ‘हे’ Smart TV

Amazon Great Indian Festival Sale । सध्या भारतात सणासुदीचा काळ सुरु असून याच पार्श्वभूमीवर इ कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणला आहे. या सेलमध्ये मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट, लॅपटॉप, टॅबलेट, फॅशन, किचन,  फ्रिज यासारख्या सर्व प्रॉडक्टवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहे. स्मार्टफोन सोबतच स्मार्ट टीव्हीवर देखील बंपर डिस्काउंट ऑफर या सेल मध्ये देण्यात येत आहे. जर तुम्ही Smart TV घेण्याचा विचार करत असाल तर Amazon आणि Flipkart च्या या सेलवर तुम्ही डिस्काउंट ऑफरसह Smart TV घरी घेऊन जाऊ शकता. चला तर जाणून घेऊया नेमक्या कोणत्या टीव्ही वर किती रुपयांचा डिस्काउंट आहे.

   

Redmi Smart TV 32 inch-

Redmi कंपनीचे स्मार्टफोन तर भारतात प्रचंड प्रसिद्ध आहे. पण या कंपनीच्या Redmi Smart बद्दल बोलायचं झालं तर अप्रतिम  स्मार्ट प्रॉडक्ट या कंपनीकडे उपलब्ध आहेत. Redmi कंपनीचा हा Smart TV 32 इंच Smart LED FIRE TV सह उपलब्ध आहे. हा स्मार्ट टीव्ही 60 hz रिफ्रेश रेट प्रदान करते. या स्मार्ट टीव्ही मध्ये विविड पिक्चर इंजिन आणि 20 W डॉल्बी ऑडिओ स्पीकर उपलब्ध आहे. या टीव्ही मध्ये बरेच एप्लीकेशन देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. यासोबतच नेटफ्लिक्स यासारख्या बऱ्याच ओटीटी प्लॅटफॉर्मचे एक्सेस देखील यामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही हा Smart TV अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणार असाल तर तुम्ही फक्त 9499 रुपयांमध्ये हा स्मार्ट टीव्ही घरी घेऊन जाऊ शकतात. त्याचबरोबर यावर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे.  त्यानुसार SBI कार्ड वरून तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करणे असाल तर तुम्हाला 1500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येईल. एक्सचेंज ऑफरनुसार तुम्ही तुमचा जुना TV देऊन नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. त्यानुसार आणखीन कमी किमतीमध्ये तुम्ही Smart TV घरी घेऊन जाऊ शकाल.

LG 32 inch HD Ready TV

LG कंपनीचा हा HD Smart TV आहे. या Smart TV मध्ये 16 W स्पीकर उपलब्ध आहे. यामध्ये गेम ऑप्टीमायझर आणि AI प्रोसेसिंग यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध आहेत.  LG HD Ready टीव्ही हा 32 इंच डिस्प्ले सह उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 60  HZ रिफ्रेश रेट प्रदान करतो. हा स्मार्ट टीव्ही  WEBOS वर काम करतो. या स्मार्ट टीव्ही मध्ये बऱ्याच ओटीटी प्लॅटफॉर्म चे ॲक्सेस देखील उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्ट टीव्ही ची किंमत 30,990 रुपये आहे. परंतु amazon वर सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या माध्यमातून तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 13,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. त्याचबरोबर या स्मार्ट टीव्हीवर अमेझॉन कडून 300 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध करण्यात येत आहे. जर तुम्ही हा स्मार्ट टीव्ही ICICI क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणार असाल तर तुम्हाला 2,200 रुपयांचा वेलकम रिवार्ड देखील उपलब्ध होईल.

Blaupunkt 43 inch QLED tv

Blaupunkt या पॉप्युलर ब्रँड ने नवीन लॉन्च केलेला Smart TV देखील या सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या टीव्ही मध्ये 43 इंच  QLED 4k डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन आणि HDR 10 + ला सपोर्ट करतो. या टीव्ही मध्ये 50W स्पीकर उपलब्ध असून डॉल्बी ऍटमॉस आणि डॉल्बी डिजिटल प्लस सपोर्ट देखील उपलब्ध आहे.  या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटी साठी  ब्लूटूथ 5.0 , ड्युअल ब्रँड वाय-फाय हे फीचर्स मिळतात. त्याचबरोबर  या टीव्हीचा रिमोट मध्ये गुगल असिस्टंट  साठी स्पेशल बटन सुसज्जा करण्यात आले आहे. ही टीव्ही गुगलच्या OS वर काम करते. या टीव्हीची किंमत  28 हजार 999 रुपये आहे.

Blaupunkt 55 inch google tv

जर तुम्ही मोठा डिस्प्ले असलेला टीव्ही घेऊ इच्छित असाल तर Blaupunkt या पॉप्युलर ब्रँडचा 55 इंच वाला google टीव्ही तुम्ही खरेदी करू शकतात. या टीव्ही ची किंमत 34 हजार 999 एवढी आहे. यामध्ये ब्लूटूथ 5.0, ड्युअल बँड वाय-फाय, गुगल असिस्टंट पावर्ड रिमोट यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. ही टीव्ही 1.1 बिलियन कलर्स सह 4K HDR 10+ डिस्प्ले सह सुसज्ज आहे. यामध्ये बेजल लेस डिझाईन, अलोय स्टॅन्ड, डॉल्बी डिजिटल प्लस, सिनेमॅटिक साऊंड कॉलिटी, DTS टेक्नॉलॉजी सह  60W स्टीरियो बॉक्स स्पीकर सिस्टीम उपलब्ध आहे. या TV मध्ये इनबिल्ड क्रोम कास्ट, एअर प्ले सपोर्ट  सह 10,000 पेक्षा जास्त ॲप्स उपलब्ध आहे.