Amazon Great Indian Festival सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु

Amazon Great Indian Festival । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ॲमेझॉन ओळखले जाते. सणासुदीच्या काळात ग्राहकांना स्वस्तात वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून ॲमेझॉन वेगवेगळे सेल आणत असत. आताही ८ ऑक्टोबरपासून Amazon Great Indian Festival सेल सुरु होणार आहे. या सेलच्या माध्यमातून तब्बल 25000 पेक्षा जास्त वस्तूंवर तुम्हाला आकर्षक असा डिस्काउंट देण्यात येणार आहे.

   

याबाबत Amazon चे भारतीय ग्राहक व्यवसायाचे उपाध्यक्ष आणि कंट्री मॅनेजर मनीष तिवारी यांनी निवेदन जारी केले. त्यावेळी ते म्हणाले की, अमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिवल 2023 हा सेल भारतातील लाखो ग्राहकांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा फेस्टिवल बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना लीडिंग ब्रँड्स आणि हजारो नवीन लॉन्च झालेल्या प्रोडक्टचा एक्सेस देण्यात येणार आहे.

या वस्तूंवर बंपर डिस्काउंट- Amazon Great Indian Festival

Amazon Great Indian Festival सेल मध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर डिस्काउंट, बँक ऑफर देण्यात येणार आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज अप्लायन्सेस वर 65 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. टीव्ही, डेली नीड्स प्रॉडक्ट वर देखील 60 टक्क्यांपर्यंत सूट या सेलमध्ये देण्यात येणार आहे. तसेच 5699 पासून सुरु होणारे लेटेस्ट स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांना खुले करण्यात येणार आहे. यासोबतच 8999 पासून सुरु होणारे 5G स्मार्टफोन, देखील या सेलमध्ये असतील.

Amazon Great Indian Festival सेल मध्ये टॉप मोबाईल, टीव्ही, अप्लायन्सेस, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकीच्या सर्व प्रॉडक्ट वर 18 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI फीचर्स देखील देण्यात येईल. एवढेच नाही तर कस्टमर्स आठ भाषांपैकी कोणत्याही भाषेचा वापर करून खरेदी करण्याचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी , तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बांगला या भाषांचा समावेश आहे.

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या माध्यमातून अमेझॉन बिजनेस कस्टमर जीएसटी इनव्हॉईस सह 28 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त बचत करू शकतात. एवढेच नाही तर उपलब्ध असलेल्या Amazon.in ऑफर यासारख्या डील, बँक ऑफर आणि कुपन याशिवाय बिजनेस कस्टमरला मोठ्या खरेदीवर 7500 पर्यंत बोनस कॅशबॅक मिळणार आहे.