टाइम्स मराठी । येत्या २६ जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होणार असून यानिमित्ताने प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या ग्राहकांसाठी Amazon Great Republic Day Sale आणला आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक वस्तूंवर ७५%सूट मिळत आहे. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ संसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात भरगोस खरेदी करणार असाल तर Amazon चा हा सेल तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या वस्तूंवर किती टक्के सूट मिळू शकते.
किती टक्के सूट – Amazon Great Republic Day Sale 2024
Amazon ने त्यांच्या साईटवर आगामी Amazon ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेलचा टीझर रिलीज केला आहे. मात्र नेमका हा सेल किती तारखेपासून किती तारखेपर्यंत असेल याबाबत कंपनीने स्पष्ट असं काही सांगितलं नाही. Amazon Great Republic Day Sale 2024 मध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. तसेच तुम्हाला जर 5G मोबाईल पाहिजे असेल तर 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत तो खरेदी करता येईल. याशिवाय लॅपटॉप आणि स्मार्टवॉच वर सुद्धा तुम्हाला 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्ही जर या नव्या वर्षात स्मार्ट टीव्ही आणि इतर घरगुती उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऍमेझॉनच्या या सेलमध्ये तुम्हाला 65 टक्क्यांपर्यंत भगरोस सूट मिळणार आहे.
येव्हडच नव्हे तर Amazon Great Republic Day Sale 2024 मध्ये SBI क्रेडिट कार्ड आणि EMI वर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळू शकेल. जर तुम्ही तुमचा जुना मोबाईल एक्सचेंज करू इच्छित असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर सुद्धा या सेलच्या माध्यमातून मिळते. परंतु तुमच्या जुन्या मोबाईलच्या कंडिशन वर त्या मोबाईलची किंमत अवलंबून असेल.