सॅटेलाइट इंटरनेट सुविधा देण्यासाठी Amazon ने घेतली उडी; मस्क यांच्या स्टारलिंकला देणार टक्कर

टाइम्स मराठी । हे डिजिटल युग असून आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. आपल्याला टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध होत असते. यासाठी वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्या आपल्याला सुविधा उपलब्ध करून देत असतात. आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्विस सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी स्टारलिंक या कंपनीने सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा सुरू करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर जिओ आणि वनवेब या कंपन्या देखील सॅटेलाईट इंटरनेट सुविधा ग्राहकांना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच या दोन्ही कंपन्यांना DOT यांच्याकडून मंजुरी मिळाली असून आता अमेझॉनने पहिले सॅटेलाईट इंटरनेट लॉन्च (Amazon Internet Satellite) केले आहे. या सॅटॅलाइटच्या माध्यमातून कंपनीने स्पेस इंटरनेट सर्विस सुरू केली आहे.

   

Amazon ने या सॅटेलाईटला प्रोजेक्ट कुईपर असे नाव दिले आहे. ६ ऑक्टोबरला दुपारी 2:6 मिनिटांनी हे सॅटेलाईट लॉन्च करण्यात आले. हे सॅटॅलाइट फ्लोरिडामध्ये सॅटेलाईट कूईपर सेट 1, आणि सॅटेलाईट कूईपर सेट 2 या नावाने ॲटलसवी रॉकेट च्या माध्यमातून लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये 3200 सॅटेलाईटचा समावेश असेल. हे सॅटॅलाइट मेगा कन्सल्टेशनच्या मेन कंपोनेट्सची चाचणी करण्यासाठी पृथ्वीपासून 500 किलोमीटर वर कक्षामध्ये स्थापित करण्यात येणार आहे.

Amazon च्या एफएक्यू यांच्या मते, कुइपरसैट-1 और कुइपरसैट-2 या दोन्ही सॅटेलाईटला ULA च्या नवीन वल्कन सेंटूरच्या पहिला मिशनच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येणार होते. परंतु त्या रॉकेटला लॉन्च होण्यासाठी वेळ असल्यामुळे एटलस वी या रॉकेटमध्ये शिफ्ट व्हावे लागले. यासोबतच भविष्यामध्ये वल्कन सेंटूर या रॉकेटच्या माध्यमातूनच कुईपरचे सॅटॅलाइट लॉन्च केले जातील. या रॉकेटच्या पहिल्या ग्रुप मध्ये 3,236 सैटेलाइट सहभागी होणार आहे.

यूएस फेडरल कम्युनिकेशंस कमीशन यांच्याकडे ॲमेझॉनने लायसन साठी फाइल्स पाठवली आहे. त्यानुसार कंपनी जुलै 2026 पर्यंत पहिल्या ग्रुप मध्ये पाठवण्यात येणाऱ्या सॅटॅलाइट पैकी कमीत कमी प्रोजेक्ट कुइपर सॅटॅलाइ चे आरेखन करेल. आणि सर्व काही सुरळीत पार पडल्यास ॲमेझॉन 2024 च्या अखेर पर्यंत ग्राहकांना सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा उपलब्ध करेल. Amazon ची ही सॅटेलाइट इंटरनेट सुविधा एलोन मस्क यांच्या स्टारलिंकला टक्कर देईल.