Amazon ने लॉन्च केले AI Chatbot; करेल वेगवेगळ्या प्रकारचे काम  

टाइम्स मराठी । आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. 2022 मध्ये ChatGPT लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर  गुगल कंपन्यांसोबतच IT कंपन्यांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर करणे सुरू केले. आर्टिफिशल इंटेलिजंटच्या माध्यमातून सर्व कामे सोपे होत असल्यामुळे सर्व कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर आपल्या एप्लीकेशन मध्ये करत आहेत. यासोबतच बऱ्याच कंपन्या AI चॅटबॉट देखील लॉन्च करत आहे. अशातच आता Amazon कंपनीने देखील AI चॅटबॉट लॉन्च केला आहे.

   

अशा पद्धतीने करेल काम

Amazon कंपनीने लॉन्च केलेल्या AI चॅटबॉटचे नाव Q आहे. या चॅटबॉटचा वापर बिझनेससाठी केला जाऊ शकतो. Amazon हे चॅटबॉट फक्त  AWS क्लाऊड कम्युटिंग कस्टमर साठी उपलब्ध करेल. हे नवीन Q AI चॅटबॉट वेगवेगळ्या प्रकारचे काम करेल. जसं की, अपलोड डॉक्युमेंट्सला समराईज करणे, सर्वर वर उपलब्ध असलेल्या स्पेसिफिक डेटाबद्दल माहिती देणे किंवा या डेटा बद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हे सर्व कामे Q AI चॅटबॉट करेल.

हा आहे AI चॅटबॉट लॉन्च करण्याचा उद्देश

Q AI चॅटबॉट हे जास्त सिक्युअर व्हर्जन आहे. या AI चॅटबॉट च्या मदतीने कंटेंट एक्सेस जास्त बारकाईने कंट्रोल करता येऊ शकते. Amazon कंपनीने  या AI चॅटबॉटची मंथली कॉस्ट 20 डॉलर एवढी ठेवली आहे. AI चॅटबॉट लॉन्च करण्यामागे कंपनीचा उद्देश, संवादात्मक AI लँडस्केप मध्ये स्वतः ची जागा बनवणे आहे.

AI मॉडेल TITAN देखील केले सादर

अमेझॉनने Q AI चॅटबॉट सोबतच इमेज जनरेशन AI मॉडेल TITAN देखील सादर केले आहे. हे AI मॉडेल बिझनेस मॅनला इमेज क्रिएट करण्यास मदत करेल. अमेझॉनचे हे TITAN इमेज जनरेटर टेस्ट टू इमेज टूल आहे. हे टूल टेक्स्ट प्रॉम्प्ट बेस्ड इमेज क्रिएट करू शकतो. यासोबतच या टूल मध्ये  उपलब्ध करण्यात आलेल्या इमेजला एडिट करण्याची देखील क्षमता आहे. यासोबतच ॲडव्हर्टाईसिंग, ई-कॉमर्स, मीडिया, एंटरटेनमेंट  या क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात  स्टुडिओ कॉलिटी असलेली आणि रियलिस्टिक इमेज देखील हे टूल डेव्हलप करून देऊ शकते.