Nothing Phone 2, TECNO Camon 20 खरेदी करायचाय? तर अमेझॉनवर मिळतीये बंपर ऑफर!

TIMES MARATHI | स्मार्टफोन आजकाल अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे गरजेचा झाला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून पर्सनल ऑफिशियल सर्व कामे एका क्लिकवर होत असतात. त्यामुळेच शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन खरेदीसाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. सध्या अमेझॉनवर कोणताही सेल सुरू नसला तरीही, स्मार्टफोन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येत आहे. जेणेकरून कमी किमतीमध्ये ग्राहक स्मार्टफोन खरेदी करू शकतील. अमेझॉन या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, तुम्हाला बँक ऑफरसह नो कॉस्ट इएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ होऊ शकतो. ही ऑफर फक्त काहीच स्मार्टफोनवर उपलब्ध असून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये लेटेस्ट Nothing 2, TECNO Camon 20 Premier 5GG, Samsung Galaxy Z Flip 5 5G या स्मार्टफोनचा देखील समावेश करण्यात आला आहे.

   

TECNO Camon 20 Premier 5GG

टेक्नो कंपनीच्या या स्मार्टफोनसाठी अमेझॉनवर बँक डिस्काउंट देण्यात येत आहे. TECNO Camon 20 Premier 5G या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 6.67 इंच या साईज मध्ये उपलब्ध असून फुल HD+ रेजोल्यूशन सह येतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. या स्मार्टफोनमध्ये सेरेनिटी ब्लू आणि डार्क वेल्किन कलर ऑप्शन उपलब्ध आहे. टेक्नो कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 29,999 एवढी आहे. परंतु अमेझॉन वर सुरू असलेल्या बँक ऑफरनुसार सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन HSBC बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करू इच्छित असाल तर, तुम्हाला 5टक्के डिस्काउंट मिळू शकतो. यासोबतच ईएमआय ऑफर च्या माध्यमातून 1454 रुपयांचा EMI मिळू शकतो. एवढेच नाही तर या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही 28,499 रुपयांच्या एक्सचेंज ऑफर नुसार हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

Nothing Phone 2

नथिंग हा स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशन मध्ये लॉन्च करण्यात आहे. हा स्मार्टफोन 12GB रॅम सह 512 GB इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध असून याची किंमत 54,999 रुपये आहे. अमेझॉनवर सुरू असलेल्या ऑफरनुसार तुम्ही हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करू शकतात. Citibank क्रेडिट कार्ड होल्डरला बँक ऑफरनुसार 1000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर, या स्मार्टफोनवर 2,908 रुपये ईएमआय आणि 40,100 रुपये एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. या स्मार्टफोन मध्ये 6.5 इंच फुल एचडी LTPO OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4nm वर बेस्ड स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 चिपसेट देण्यात आला आहे. एवढेच नाही तर या प्रोसेसर मध्ये ग्राफिक्स सह एड्रेनो 730 जीपीयू वापरले गेले आहे. हा स्मार्टफोन Android13 वर आधारित असलेल्या नथिंग ओएस 2.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4700mAh बॅटरी दिलेली असून ती 45W PPS वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Nothing Phone 2 या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला ड्युअल रियल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टेबीलायझेशन (OIS) मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर सेकंडरी कॅमेरा सेटअप मध्ये 50MP अल्ट्रा वाईड अँगल सह 1/2.74 इंच Sony IMX615 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये 32 MP f/2.45 अपर्चर वाला फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.

Samsung Galaxy Z Flip 5 5G

सॅमसंग कंपनीच्या या Galaxy Z Flip 5 वेरियंट मध्ये 6.7 इंचचा फुल एचडी डायनामिक अमोलेड 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 1080× 2640 पिक्सल मध्ये उपलब्ध आहे. या वेरियंटमध्ये एक्स्टर्नल डिस्प्ले 3.4 इंच सुपर AMOLED हा देण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर ONE UI 5.1.1 यावर काम करतो. या स्मार्टफोनच्या 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये एवढी आहे. अमेझॉनवर या स्मार्टफोन खरेदीसाठी बँक ऑफर ईएमआय ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. बँक ऑफरनुसार हा स्मार्टफोन एचडीएफसी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर, तुम्हाला 7 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. 50,100 रुपयांपर्यंत तुम्हाला एक चेंज ऑफर आणि 4,583 रुपयांपर्यंत ईएमआय ऑफर देण्यात येत आहे.