Amazon ची बंपर ऑफर! महागडे स्मार्टफोन मिळणार स्वस्तात; iPhone, Samsung Galaxy वर मोठा Discount

टाइम्स मराठी । एक महागातला स्मार्टफोन आपल्या जवळ असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र सर्वसामान्य माणसाला हे महागडे फोन दुकानात जाऊन घेणे परवडणारे नसते. त्यामुळे याच गोष्टीचा विचार करुन अ‍ॅमेझॉनने स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक बंपर सेल आणला आहे. येत्या १५ जुलै ते १६ जुलै दरम्यान अ‍ॅमेझॉन प्रामई डे सेलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महागडे फोन स्वस्तात मिळणार आहेत. त्यामुळे जर कोणाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी अ‍ॅमेझॉनने सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे.

   

अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये मोजक्या काही फोनची किंमत आपल्याला परवडेल अशा दरात ठेवण्यात आली आहे. यामध्ये आयफोन १४ ची किंमत फक्त ६९,४९९ रुपये अशी आहे. दुसऱ्या ठिकाणी हा फोन ७०,००० किंमतीला विकला जात आहे. परंतु अ‍ॅमेझॉन सेलमुळे हा फोन कमी किंमतीत मिळत आहेत. याचबरोबर इतर ही स्मार्फफोन ही सेलमध्ये कमी किंमतीत मिळत आहे. यामध्ये खालील स्मार्टफोनचा समावेश आहे.

Google Pixel 7 5G

हा फोन अ‍ॅमेझॉनवर खूप कमी दरात उपलब्ध आहे. सेलमध्ये या फोनची किमत फक्त ४७,९९९ इतकीच आहे. इतकेच नव्हे तर, यावर तुम्हाला १,२७५ रुपयांची सुट आहे. फ्लिपकार्टवर हा Google Pixel 7 5G ५०,००० रुपयात उपलब्ध आहे. जर तुम्ही हा फोन एक्सिस कार्डवरुन खरेदी केला तर तो तुम्हाला १००० मध्ये बसेल. त्यामुळे इतर ठिकाणाहून हा फोन तुम्हाला सेलमध्ये स्वस्त बसत आहे.

Samsung Galaxy S23 5G

हा फोन इतर ठिकाणी ७४,९९९ ला विकला जात आहे. मात्र सेलमध्ये हा फोन फक्त ७३,९९९ मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा  असेल तर तुम्ही सेलमधून सहज खरेदी करु शकता. तसेच क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर यावर तुम्हाला विशेष सुट देखील देण्यात येत आहे. कंपनी तुम्हाला सेलमार्फत कमी सुट देऊन घेऊ इच्छिणारा फोन कमी किमतीत उपलब्ध करुन देत आहे.

OnePlus 10 Pro 5G

अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये वनप्लस फोन फक्त ५१,९९९ मध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. इतर ठिकाणी याची किमत ६६,९९९ रुपये इतकी सुरु आहे. तसेच तुम्ही जर हा फोन क्रेडिट कार्डवरुन खरेदी केला तर यामधअये तुम्हाला ५००० रुपयांची देखील सुट मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अ‍ॅमेझॉन सेलचा फायदा घ्या. हा सेल फक्त १५ जुलै ते १६ जुलै दरम्यान सुरु आहे.