Amazon वर बंपर सेल; अनेक वस्तूंवर मिळणार मोठा Discount

टाईम्स मराठी । प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनच्या प्राईम डे सेल ची सुरुवात 15 जुलैपासून होत आहे. हा सेल २ दिवस सुरू राहणार असून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तूंवर भरगोस सवलत देण्यात येणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या बँक ऑफर, डिस्काउंटदेखील ग्राहकांना देण्यात येणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, अप्लायन्सेज, होम, किचन, फर्निचर, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट या सर्व वस्तूंवर जबरदस्त सूट मिळणार आहे. अमेझॉन प्राईम डे सेल साठी मायक्रोसाईट बनवण्यात आली आहे. या मायक्रोसाईटवर बेस्ट सेलिंग स्मार्टफोन लिस्ट करण्यात आले आहेत .

   

या अमेझॉन प्राईम डे सेलमध्ये मोबाईल आणि ॲक्सेसरीजवर 40% सूट तर इलेक्ट्रॉनिक्स अँड ॲक्सेसरीज वर 75% होम आणि किचन वर 70% फॅशन प्रॉडक्ट वर 50 ते 80%, स्मार्ट टीव्ही आणि अप्लायन्सेस वर 60 टक्के, डेली एसेन्शियल वर 60 टक्के, बुक्स, टॉय वर 70 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमेझॉनच्या ब्रँडवर 70% सूट देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या सेलमध्ये फ्लाईट बुकिंग वर 25 टक्के, हॉटेल बुकिंग वर 50 टक्के, बस बुकिंगवर 10 टक्के, ट्रेन बुकिंग वर जिरो गेटवे चार्ज या ऑफर देण्यात आलेली आहे.

कोणकोणत्या वस्तूंवर बंपर डिस्काउंट –

अमेझॉनच्या या सेल मध्ये Realme Narzo N53, Oneplus Nord CE 3 Lite 5G, oneplus 11R 5G, iphone14 smartphone, Dell laptop , Asus TUF A15 Gaming laptop, Xiaomi pad 6, LG UltraGear gaming monitor या वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. अमेझॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मिळालेल्या माहिती नुसार, या सेलमध्ये 35 हजार रुपये पर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सेलमध्ये काही नवीन प्रॉडक्ट देखील लॉन्च होतील. या सेलच्या लाईव्ह ऑफर्स मध्ये 5000 रुपया पर्यंत रिवार्ड कॅशबॅक देखील देण्यात येणार आहे.