Ambrane Fyre Smartwatch : Ambrane ने लाँच केलं AMOLED डिस्प्लेवालं Smartwatch; 1,599 रूपयांत खरेदी करण्याची संधी

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये देसी टेक ब्रँड Ambrane कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च (Ambrane Fyre Smartwatch) केलं आहे. AMOLED डिस्प्ले असलेलं हे स्मार्टवॉच अतिशय स्वस्त असून याची किंमत 1999 रुपये आहे. मात्र Flipkart वरील सेलवर हेच स्मार्टवॉच तुम्ही अवघ्या 1,599 रुपयात खरेदी करू शकता. आज आपण या स्मार्ट वॉचचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

Ambrane Fyre या स्मार्टवॉचमध्ये 2.04 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा AMOLED डिस्प्ले असून यामध्ये क्रिस्टल क्लियर व्हिज्युअल उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 800 nits पीक ब्राईटनेससह येतो. त्याचबरोबर या डिस्प्ले मध्ये 368 × 448 स्क्रीन रिझोल्युशन 60 hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. Ambraneच्या या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने ऑलवेज ऑन डिस्प्ले उपलब्ध केला आहे.

फिचर्स– Ambrane Fyre Smartwatch

Ambrane Fyre स्मार्टवॉच मध्ये हेल्थ, फिटनेस संबधित बरेच फीचर्स उपलब्ध आहे. यासोबतच unipaid टेकसह  ब्लूटूथ कॉलिंग फीचर देखील यामध्ये उपलब्ध आहे. या फीचरमुळे बिल्ट इन मायक्रोफोन आणि स्पीकर सह सोप्या पद्धतीने कॉलिंग करता येईल. फिजिकल क्राऊन सह नेवीगेशन ऑप्शन देखील यामध्ये देण्यात आले आहे. Ambrane कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये 100 पेक्षा जास्त कस्टमाइजेबल वॉच फेसेस देखील दिले आहे.

हेल्थ रिलेटेड फीचर्स

या स्मार्टवॉच मध्ये (Ambrane Fyre Smartwatch) spO2 मॉनिटरिंग, ब्रीदिंग ट्रेनिंग, स्लीप एनालिसिस, हार्ट रेट अलर्ट यासारखे बरेच आरोग्याच्या संबधित फीचर्स उपलब्ध आहे. याशिवाय व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, यूजर वेदर फोरकास्ट, कॅमेरा कंट्रोल, कॅल्क्युलेटर, म्युझिक प्ले बॅक कंट्रोल, स्क्रीन टाईम मॉनिटरिंग, वॉच लोकेटिंग  यासारखे फीचर्स देखील कंपनीने यामध्ये दिले आहे.

किंमत किती?

Ambrane Fyre हे स्मार्टवॉच 2000 रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉच सोबत कंपनीने एक वर्षाची वॉरंटी ऑफर केली आहे. त्यानुसार या स्मार्टवॉच ची किंमत 1999 असून तुम्ही flipkart च्या अधिकारीक वेबसाईटवरून ते खरेदी करू शकता. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग बिलियन डेज सेलच्या माध्यमातून तुम्ही हे स्मार्टवॉच 1,599 रुपयात खरेदी करू शकता.