Amrit Bharat Station Scheme : सातारा, सांगली कोल्हापूरसह 16 रेल्वेस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

Amrit Bharat Station Scheme । अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागामधील कोल्हापूर सांगली सातारा यासह 16 रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेने प्रवासी संघटनांकडून सूचना मागवलेल्या असून महत्वकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला आहे. अमृत भारत योजनेच्या माध्यमातून सरकार देशभरातील जवळपास एक हजार ३०९ स्थानकांचा कायापालट करणार असून या सर्व स्थानकांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 76 स्टेशनवर प्रवासी सुविधांसाठी सुधारित नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर अमृत भारत योजनेत मिरज जंक्शन हा महत्त्वाचा स्थानकाचा समावेश नसून याबद्दल देखील रेल्वे मंत्रालय निर्णय घेणार आहे.

   

कशा पद्धतीने होणार सुधारणा – Amrit Bharat Station Scheme

अमृत भारत योजनेमध्ये स्टेशनच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त पादचारी पूल, लिफ्ट आणि एस्क्युलेटर, रहिवासी मजल्यांची सुधारणा, प्रतीक्षागृह, सुलभ शौचालयाची सुधारणा, स्थानकांच्या दर्शनी भागांची सुधारणा, स्टेशनमध्ये प्रकाश व्यवस्था सुधारणा, वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह, रेल्वे इंडिकेटर बोर्ड आणि कोच इंडिकेटर बोर्ड बसवण्यात येणार आहे. तसेच मोफत वाय-फाय किऑस्क ची सुविधा देण्यात येईल.

कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचा समावेश –

अमृत भारत योजनेमध्ये (Amrit Bharat Station Scheme) पुणे, कोल्हापूर, सांगली, कराड, हातकणंगले, सातारा, वाठार, फलटण, तळेगाव, आकुर्डी, हडपसर, चिंचवड, बारामती, देहू रोड केडगाव, उरळी, लोणंद या सर्व रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. या योजनेचा मेन उद्देश प्रवाशांसाठी वाहन पार्किंग मध्ये सुधारणा करणे, प्लॅटफॉर्मच्या शेवटचा विस्तार करणे आणि प्रवाशांना योग्य सुविधा देणे हा आहे. या स्टेशनवर आवश्यक सुविधांसाठी प्रवाशांनी 15 ऑगस्टपर्यंत सूचना देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केला आहे.

या अमृत भारत योजनेमध्ये मिरज जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश करण्यात आला नव्हता. आता या जंक्शनचा समावेश मिरज मॉडेल स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुणे मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरज स्टेशन स्वतंत्रपणे विकसित करणार येण्याचं सांगण्यात येत आहे.