हत्तीची बुद्धिमत्ता पाहून तुम्हीही ठोकाल सलाम; आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

टाइम्स मराठी । सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये हत्ती या प्राण्याचे नाव सर्वात अगोदर येते. हत्तीला गजराज म्हणून देखील ओळखतात. हत्ती फक्त बुद्धिमानच नाही तर शक्तीमान देखील आहे. या हत्तीची युक्ती आणि बुद्धिमत्ता दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला देशातील सर्वात मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही या हत्तीला आणि त्याच्या बुद्धिमत्तेला सलाम ठोकाल

   

काय आहे व्हिडिओत –

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला तारेचे कुंपण लावलेले आहे. आणि त्या कुंपणच्या दुसऱ्या साईड ला जंगल असण्याची शक्यता दिसतेय. या जंगलातून एक मोठा हत्ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं दृश्य दिसत आहे. परंतु हत्तीला तारेच्या कुंपणामुळे बाहेर निघता येत नसल्यामुळे त्याची तगमग सुरु आहे. तो बाहेर निघण्यासाठी सर्वांत आगोदर तारेच्या कुंपणाला पाय लावून त्यामध्ये विद्युत प्रवाह आहे कि नाही हे तपासतो. बऱ्याचवेळ तारेच्या कुंपणावर पाय देतो. आणि शेवटी तारेमध्ये विद्युत प्रवाह नसल्याचा निश्चित झाल्यानंतर तो तारेचे कुंपण पायाने तुडवत आरामात रस्ता ओलांडतो.

हा व्हिडिओ सर्वात मोठे उद्योगपती आनंद महेंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन मध्ये तीन महत्त्वाचे संदेश देखील दिले आहे. त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलं की, हत्तीचा मास्टर क्लास, हे पाहून जीवनातील लहान मोठ्या अडचणींवर मात करायला आपण शिकू शकतो.

  1. आपल्या मार्गामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीला सामोरे जाण्याची आपली क्षमता आहे का हे तपासणे करणे गरजेचे आहे.
  2. आपली क्षमता आणि ताकद ओळखून आपण त्या अडचणींमधून मार्ग काढायला हवा
  3. आणि आत्मविश्वासाने पुढे चालणं देखील गरजेचं आहे असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल. आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून अनेकांनी लाईक करत कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे.