अनंत चतुर्दशीला “अनंताचा धागा” एकदा बांधूनच पहा, नशीब असे चमकेल की सर्व गोष्टी नव्याने चांगल्या घडतील!

टाइम्स मराठी । आज 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. आजच्या दिवशीच गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. या दिवशी बाप्पाचे विसर्जन जरी केली जात असले तरी धर्मशास्त्रामध्ये अनंत चतुर्दशीला एक अनन्य महत्व आहे. या अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक पूजा देखील केली जाते आणि या पूजेमध्ये एक धागा पूजला जातो. त्यानंतर हा धागा मनगटावर बांधला जातो. या धाग्याचे नेमके अध्यात्मशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे,हे आज आपण जाणून घेणार आहोत तसेच या भागाचे आपल्याला काय काय फायदे होतात हे देखील सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

   

अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन जरी होत असले तरी या दिवशी श्रीविष्णूंची अनंत या रूपाने तुझ्या अर्चना देखील केली जाते. श्रीविष्णुभक्त विष्णूला प्रसन्न करण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजा अर्चना करत असतात. या दिवशी एक धागा आपल्या मनगटावर बांधलेला असतो. या धाग्याला संरक्षण कवच देखील म्हटले जाते. जे फक्त अनंत चतुर्थीच्या दिवशी श्रीविष्णूची पूजा अर्चना करतात त्यांचे संपूर्ण दुःख भगवान श्री विष्णू दूर करतात. अनंत चतुर्दशीच्या दरम्यान अनंत रुपाची एक कथा देखील सांगण्यात आलेली आहे. जेव्हा पांडव युद्धामध्ये सारे काही हरून गेले होते तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णूचे व्रत करायला सांगितले होते. अनंताचे व्रत केल्यामुळे पांडवांना सारे वैभव पुन्हा प्राप्त झाले. श्री विष्णू यांचे अनंत रूप म्हणजे ज्याला सुरुवात नाही व शेवटही नाही. असे अनंत रूप म्हणजे श्रीविष्णू यांचे प्रति रूप आहे म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीविष्णुरूपाची पूजा अर्चना भक्तजन आवर्जून करत असतात. अनंताचे व्रत तसे पाहायला गेले तर कठीण आहे. 14 वर्ष हे आपल्याला व्रत करावे लागते परंतु जर तुम्हाला हे शक्य झाले नाही तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही श्रीविष्णूची पूजा करून हा अनंताचा धागा आपल्या मनगटावर बांधू शकता, असे केल्याने देखील तुम्हाला श्री विष्णू यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. श्री विष्णू तुमचे सारे दुःख दूर करू शकतात. तुमच्यावर कृपादृष्टी करून तुमचे जीवन मंगलमय करू शकतात.

या दिवशी श्रीविष्णू यांच्या अनंत स्वरूपाची पूजा करत असताना एक धागा देखील पूजला जातो. हा लाल रंगाचा धागा असून या धाग्यामध्ये 14 गाठी बांधल्या जातात. हा धागा पुरुष उजव्या मनगटावर तर महिला डाव्या मनगटावर बांधू शकतात. या धाग्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी शक्ती असते. या शक्तीमुळे तुमचे जीवन उज्वल होऊ शकते. भगवान श्री विष्णू तुमच्यावर कृपाशीर्वाद तर करतात पण त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्व या धागाच्या परिधानाने दूर होतात. धाग्याची पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला श्री विष्णू यांची पूजा करायची आहे व त्यानंतर लाल धाग्यामध्ये 14 गाठी मारायच्या आहेत. या चौदा गाठी श्री विष्णू यांच्या 14 रूपांचे प्रतीक मानले जाते त्यानंतरच श्री विष्णू नामाचा 108 वेळा जप करायचा आहे. हा जप मंत्र पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनगटावर हा धागा बांधायचा आहे. हा धागा बांधल्यानंतर पुढील 14 दिवस आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मद्यपान करायचा नाही. काही गोष्टी आपल्याला पाळायचे आहेत, असे केल्याने तुमच्या जीवनात शुद्धता निर्माण होईल. या 14 सूत्र गाठी मुळे तुमचे आयुष्य उज्वल होईल म्हणूनच आजच्या या दिवशी श्रीविष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करायला विसरू नका व हा आनंदाचा धागा आपल्या मनगटावर अवश्य बांधा.