Apache RTR 310 लाँच; आकर्षक लूक, फीचर्सही दमदार, किंमत किती?

टाइम्स मराठी । टीव्हीएस मोटर कंपनीने Apache RTR 310 ही स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.43 लाख रुपये एवढी आहे. कंपनीने या बाईकचे तीन व्हेरियंट लॉन्च केले आहे. TVS मोटर कंपनीने या बाईक साठी आधीच प्री बुकिंग सुरू केली होती. आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी या आकर्षक अशा स्पोर्ट बाईकची डिलिव्हरी सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही स्पोर्ट बाईक बाजारात विक्रीसाठी असलेल्या बीएमडब्ल्यू जी310R, new KTM 390 ड्यूक, आणि आगामी काळात लॉन्च होणारी यामाहा MT 03 ला टक्कर देणार आहे.

   

इंजिन –

Apache RTR 310 ही बाईक 312cc, सिंगल सिलेंडर, 4 वॉल लिक्विड कुल्ड इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 34 पीएस पावर आणि 27.3 NM पीक टॉर्क जनरेट करते. एवढेच नाही तर अर्बन आणि रेन मोडमध्ये ही बाईक 25.8 पी एसची पावर आणि 25 Nm पर्यंत पीकटॉर्क जनरेट करते. या बाईक मध्ये सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. या गिअर बॉक्सच्या मदतीने गाडीला पॉवर दिली जाते. ही बाईकचे टॉप स्पीड 150 किलोमीटर प्रति तास इतकं आहे. यासोबतच ही बाईक 2.81 सेकंदामध्ये झिरो ते साठ किलोमीटर प्रति तास एवढा वेग वाढवू शकते. या बाईक मध्ये अर्बन,रेन, स्पोर्ट आणि ट्रॅक असे चार वायडिंग मोड देण्यात आले आहे.

Apache RTR 310 3

फीचर्स – Apache RTR 310

Apache RTR 310 या नवीन स्पोर्ट बाईक मध्ये क्रूज कंट्रोल, 5 राईड मोड, डायनामिक हेड लॅम्प, क्लायमेट कंट्रोल सीट, डायनॅमिक ट्विन टेल लॅम्प, बाय डायरेक्शनल क्विक शिफ्टर, रेस ट्युंड डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल , टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यासारखे सेगमेंट फर्स्ट फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच Apache RTR 310 या बाईक मध्ये अलॉय व्हील, टी एफ टी डिस्प्ले, ट्रॅपेजोईडल मिरर, नवीन रियल सबफ्रेम, नवीन स्प्लिट सीट सेटअप, यासह नवीन ट्रेलीस फ्रेम देण्यात आली आहे.

Apache RTR 310

किंमत किती?

Apache RTR 310 या मॉडेलचे तीन व्हेरीएंट लॉन्च करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे आर्सेनल ब्लॅक हा आहे. दुसरा व्हेरीएंट क्विक शिफ्टर सह आर्सेनल ब्लॅक आणि तिसरा व्हेरीएंट फ्यूरी येलो हा आहे. व्हेरीएंट नुसार बाईकच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. यातील आर्सेनल ब्लॅकची किंमत 2.43 लाख रुपये एवढी आहे. क्विक शिफ्टर सह आर्सेनल ब्लॅक ची किंमत 2.58 लाख रुपये आहे. आणि फ्यूरी येलो ची किंमत 2.64 लाख रुपये आहे.