Apple ‘या’ तारखेपर्यंत लाँच करणार फोल्डेबल iPhone

टाइम्स मराठी । मागील वर्षभरापासून अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी त्यांचे फोल्डेबल मोबाईल बाजारात आणले आहेत. दिसायला आकर्षक असणाऱ्या या स्मार्टफोनचे वेड ग्राहकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तस पाहिले तर फोल्डेबल मोबाईलच्या किमती इतर मोबाईलच्या तुलनेत महाग असलं तरी त्याची मागणी वाढतच चालली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड Apple सुद्धा आता फोल्डेबल स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी Motorola, Samsung, Oppo ने आपले फोल्डेबल मोबाईल बाजारात आणले होते. मात्र अँपल ने अजूनही असा स्मार्टफोन लाँच केला नाही. परंतु आता २०२६ पर्यंत अँपल आपला पहिलावहिला मोबाईल बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे.

   

काही दिवसापूर्वी असे काही अहवाल समोर आले आहेत ज्यात असा दावा करण्यात आला होता की Apple 2026 पर्यंत फोल्डेबल आयफोन तयार करणार नाही, परंतु आता Revegrus च्या म्हणण्यानुसार, 2026 पर्यंत आपला पहिला फोल्डेबल आयफोन लॉन्च करण्याचे टार्गेट Apple ने ठेवलं झालं. टेक न्यूजची माहिती देणाऱ्या X अकाउंटद्वारे ॲपलच्या फोल्डेबल आयफोन बद्दलमोठी अपडेट समोर आली आहे. ऍपलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्फाबिझच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, “काळजीपूर्वक विचार केल्यानंतर ऍपलने 2026 पर्यंत फोल्डेबल आयफोन रिलीझ करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अहवालानुसार, Apple च्या आगामी फोल्डेबल iPhone मध्ये क्लॅमशेल फॉर्म-फॅक्टर असेल आणि तो दिसायला Moto Razr 40 Ultra Samsung Galaxy Z Flip 5, Oppo Find N3 Flip सारखा असू शकतो. हा फोल्डेबल मोबाईल अतिशय स्लिम डिझाईन मध्ये बाजारात आणण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कदाचित यामुळेच मोबाईलच्या डिझाईनला वेळ लागत आहे.