Apple Journal App : Apple ने iOS 17.2 अपडेट सह लॉन्च केले Journal App

टाइम्स मराठी । Apple कंपनीने युजर साठी iOS 17.2 अपडेट रोल आउट केले आहे. या अपडेट शिवाय कंपनीने Journal App, रेकॉर्डिंग फीचर, ॲक्शन बटन कस्टमाईझेशन, मेसेज ॲप मध्ये देखील बरेच अपडेट्स उपलब्ध केले आहे.  Apple कंपनीचा iPhone तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. यासोबतच Apple कंपनी त्यांच्या युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. Apple ने उपलब्ध केलेले Apple Journal App हे पहिल्यांदा युजर साठी उपलब्ध केले असून जाणून घेऊया काय आहे हे ॲप. 

   

हे एक नवीन iPhone ॲप आहे. या ॲपच्या मदतीने आयफोन युजर्स दैनंदिन जीवनातील काही क्षण, स्पेशल घटना कॅप्चर करून लिहू शकतात. जर्नल ॲप युजर्स ला जर्नलिंगच्या माध्यमातून आभार रिफ्लेक्ट करणे, अभ्यास करणे, वेल बीइंग मध्ये सुधार करण्यासाठी मदत करेल. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फक्त लिखाण नाही तर अविस्मरणीय क्षण कॅप्चर करण्यासाठी फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग ऍड करण्याचे देखील ऑप्शन मिळेल. 

काय काय फायदे मिळणार? Apple Journal App

Apple Journal App चा वापर करून प्रायव्हेट , पर्सनलाईज सूचना आणि कस्टमाइज नोटिफिकेशन युजर्सला लेखनाची सवय विकसित करण्यास मदत करेल. या ॲपमध्ये कंपनीने प्रायव्हसी देखील उपलब्ध केली आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा तुमचा आयफोन पासकोडने लॉक करतात तेव्हा Apple Journal App मध्ये करण्यात आलेले लिखाण एन्क्रिप्ट केले जाते. यासोबतच टू फॅक्टर इथेन्शियल च्या माध्यमातून देखील हे ॲप सिक्युअर करू शकतात. यासोबतच एप्पल कंपनीने ॲप पासकोड, फेस आयडी, टच आयडी या ऑप्शनच्या माध्यमातून लॉक करण्याची सुविधा देखील उपलब्ध केली आहे.या सोबतच जेव्हा तुम्ही जनरल ॲप्स चा वापर करून लिखाण करतात तेव्हा हे लिखाण iCloud मध्ये सेव्ह होते. आणि सेव्ह करण्यात आलेली फाईल एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असते. म्हणजेच युजर शिवाय कोणीच या ॲपमध्ये आणि सेव्ह करण्यात आलेल्या डेटा पर्यंत पोहोचू शकत नाहीत.

स्पेशल रेकॉर्डिंग फीचर 

Apple कंपनीने iPhone मध्ये स्पेशल रेकॉर्डिंग फीचर देखील उपलब्ध केले आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला स्पेशल व्हिडिओ कॅप्चर करण्यास मदत होईल. हा स्पेशल व्हिडिओ 1080 पिक्सेल आणि 30 फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने लँडस्केप ओरिएंटेशन मध्ये शूट करण्यात येतो. आणि हा शूट केलेला व्हिडिओ ॲपल व्हिजन प्रो वर देखील पाहता येऊ शकतो.