Apple MacBook : आता मोबाईलच्या किंमतीत मिळणार Apple चा मॅकबुक

टाइम्स मराठी । अँपल कंपनीचा आयफोन घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड आहे. परंतु Apple चा मोबाईल किंवा Apple MacBook घ्यायचा म्हटलं तर सर्वसामान्य जनतेला तो परवडणारा नसतो. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही ते खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता कंपनी लवकरच स्वस्तात मस्त आणि अगदी मोबाईलच्या किमतीत मॅकबुक आणणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना सुद्धा तो परवडेल आणि प्रत्येकी घराघरात अँपल पोचेल.

   

क्रोमबुक मॉडेलला नवीन मॅकबुक देणार टक्कर

Digitimes यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्पल कंपनी एक बजेट फ्रेंडली मॅकबुक सिरीज तयार करत आहे. ही मॅकबुक सिरीज क्रोमबुक मॉडेल्सला टक्कर देऊ शकते. त्यासाठीच एप्पल कंपनी स्वस्तात मस्त अशी मॅकबुक सिरीज (Apple MacBook) तयार करत आहे. क्रोम बुक मॉडेल हे स्टूडेंट साठी परवडणारे आणि पॉप्युलर मॉडेल आहे. कमी किमतीत उपलब्ध असल्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परवडणारे आहे. यामुळे ॲपल कंपनी आता नवीन मॅकबुक सिरीज तयार करत आहेत. जेणेकरून क्रोमबुक मॉडेलला हे नवीन मॅकबक सिरीज टक्कर देऊ शकतील.

मॅकबुक मध्ये युजर्सला मेटल केस मिळू शकते– Apple MacBook

मिळालेल्या माहितीनुसार, एप्पल कंपनीच्या मॅकबुक एअर, प्रो सिरीज आणि अपकमिंग बजेट मॅक बुक सिरीज यामध्ये फरक असेल. कंपनीच्या या बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या मॅक बुक मध्ये युजर्स ला मेटल केस मिळू शकतो. त्याचबरोबर या कमी किमतीच्या मॅकबुकसाठी कॉस्ट इफेक्टिव मेकॅनिकल कंपोनंट्स वापरले जाणार आहेत. त्याचबरोबर एप्पल कंपनी मार्केटमध्ये येणारे ट्रेड आणि होणारी स्पर्धा बघून स्वस्तात मस्त असा मॅकबुक सिरीज लॉन्च करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

क्रोम बुकच्या खरेदीमध्ये वाढ

डिजी टाइम्स रिसर्च नुसार, शिक्षणासाठी क्रोम बुकची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या क्रोम बुक चे 2019 मध्ये 1 करोड 39 लाख युनिट डिलिव्हरी करण्यात आले होते. त्यानंतर 2021 मध्ये हा आकडा वाढून 3 करोड 35 लाख युनिट एवढा झाला.

2024 मध्ये येऊ शकतो स्वस्तात मस्त मॅकबुक

ॲपल कंपनी नवीन आणि अफॉर्डेबल मॅकबुकची (Apple MacBook) घोषणा जून मध्ये होणाऱ्या WWDC 2024 इव्हेंट मध्ये करू शकतात. परंतु सध्या तरी या मॅकबुक मॉडेल बद्दल ऑफिशियल माहिती मिळालेली नाही. अफॉर्डेबल मॅकबुक 2024 मध्ये जून- जुलै नंतर लॉन्च करण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर या मॅकबुकच्या किंमती बद्दल देखील अजून कोणतीच माहिती मिळाली नाही. परंतु 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंत हा मॅकबुक लॉन्च करण्यात येऊ शकतो.