USB-Type C पोर्टसह लॉन्च झाली Apple पेन्सिल; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Apple कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेमध्ये Iphone 15 सिरीज लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने स्वस्तात मस्त लॅपटॉपची विक्री केली होती. आता कंपनीने Apple ने भारतीय बाजारपेठेमध्ये आणखीन एक प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. हे प्रॉडक्ट कंपनीने आयपॅड युजरसाठी उपलब्ध केले आहे. हे प्रॉडक्ट म्हणजे अफोर्डेबल पेन्सिल कंपनीने लॉन्च केली आहे. ही अफॉर्डेबल पेन्सिल अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

   

Apple ने या नवीन पेन्सिल सोबत चार्जिंग आणि पेयरिंगसाठी एक डेडिकेटेड USB C पोर्ट देखील उपलब्ध केला आहे. ही नवीन एप्पल पेन्सिल फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनच्या पेन्सिल प्रमाणे ऍक्युरसी लो लेटेंसी, टिल्ट सेन्सिटिव्ह आहे. या पेन्सिलच्या माध्यमातून स्केचिंग, एनोटेटिंग, जर्नलिंग, नोट मेकिंग यासारख्या बऱ्याच गोष्टींसाठी मदत होते.

फिचर्स

ही नवीन पेन्सिल टाईप सी पोर्ट च्या माध्यमातून चार्ज केली जाईल. ही नवीन ॲप्पल पेन्सिल आयपॅड OS फीचर्स म्हणजेच स्क्रिबल, क्विक नोट, फ्री फॉर्म मध्ये दुसऱ्या डिवाइस सोबत चांगल्या पद्धतीने काम करेल. यासोबतच ही पेन्सिल आयपॅड प्रोसह इन टू मॉडेल मध्ये देखील वापरता येईल. या नवीन एप्पल पेन्सिलला होवर सपोर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार अप्रतिम स्केच आणि ड्रॉइंग तुम्ही करू शकता. ही एप्पल पेन्सिल आयपॅड मध्ये बॅटरीला सुरक्षित ठेवण्यासाठी स्लिप स्टेजमध्ये जाते. ही पेन्सिल आयपॅडला मॅग्नेटिकली अटॅच देखील होऊ शकते.

किंमत किती?

एप्पल कंपनीने ही लॉन्च केलेली पेन्सिल नोव्हेंबर महिन्यामध्ये खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या पेन्सिलची किंमत 7990 रुपये एवढी आहे. परंतु विद्यार्थ्यांसाठी ही नवीन पेन्सिल 6,990 मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या पेन्सिलच्या माध्यमातून बरेच काम सोपे होतील.