2024 साठी Apple चा मोठा प्लॅन; M3 चिपसेटसह ”हे 4 मॉडेल लॉन्च करण्याची योजना

टाइम्स मराठी । Apple कंपनी लवकरच नविन M3 चिपसेटने सुसज्ज असलेले मॅकबुक मॉडेल लॉन्च करणार असल्याची माहिती ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टच्या माध्यमातून उघड झाली आहे. सध्या कंपनी ipad pro मॉडेलवर देखील काम करत असून ipad Air दोन डिस्प्ले साईज मध्ये लॉन्च करण्याची देखील योजना आखत आहे. यासोबतच कंपनी 2024 मध्ये चार मॉडेल डेव्हलप करणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

   

ब्लुमबर्ग यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार , Apple कंपनी ipad Air मॉडेल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या ipad Air मॉडेलमध्ये 10.9 इंच डिस्प्ले मिळेल. आणि दुसरा डिस्प्ले 12.9 इंच या साईज मध्ये लॉन्च करण्यात येईल. यासोबतच ipad pro नेक्स्ट जनरेशन मॉडेल देखील कंपनी लॉन्च करेल. या नेक्स्ट जनरेशन मॉडेल मध्ये OLED स्क्रीन उपलब्ध करण्यात येईल. ही स्क्रीन मिनी LED स्क्रीनच्या तुलनेत अप्रतिम कॉन्ट्रास्ट आणि ब्लॅक लेव्हल ऑफर करेल. या ipad Pro मॉडेल मध्ये कंपनी लेटेस्ट ऑक्टोबर महिन्यात लॉन्च करण्यात आलेले M3 चिपसेटने सुसज्ज करेल.

Apple कंपनी ipad आणि MacBook दोन्ही मॉडेल 2024 यावर्षी मार्च महिन्यात लॉन्च करू शकते. यासोबतच ॲपल कंपनीची अपकमिंग आयपॅड प्रो मॉडेल आणि थर्ड जनरेशन एप्पल पेन्सिल साठी दोन नवीन मॅजिक कीबोर्ड व्हेरियंट लॉन्च करण्याची देखील योजना आहे. असे एका रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.