Apple Scary Fast Event : Apple ने लाँच केला Macbook Pro आणि iMac; किंमत पहा

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Apple च्या Apple Scary Fast Event मध्ये M3 चिपसेट प्रॉडक्टसह नवीन प्राईज रेंजमध्ये Macbook Pro आणि iMac लाँच केले आहे. या नवीन M3 चिपसेटच्या वापरामुळे मॅकबुक पूर्वीपेक्षाही दुप्पट स्पीड मध्ये काम करू शकेल. कॅलिफोर्निया येथील कंपनीच्या हेडक्वार्टर्समध्ये Apple चा Scary Fast Event पार पडला. 1984 मध्ये सर्वात आधी MAC लाँच करण्यात आले होते. त्यावेळी मेरिंटोश नावाने MAC ओळखले जात होते. आता यावर्षी Apple च्या iMac ला 25 वर्ष पूर्ण झाले आहे. Apple च्या या इव्हेंट मध्ये ग्राहकांसाठी अप्रतिम प्रोडक्ट्स उपलब्ध करण्यात आले. त्याचबरोबर कंपनीने या इव्हेंट मध्ये प्रोडक्सच्या ऍडव्हान्स बुकिंग डेट बद्दल देखील घोषणा केली. त्यानुसार आज पासून म्हणजेच 31 ऑक्टोबर पासून ग्राहक नवीन मॉडेल्सची ऍडव्हान्स बुकिंग करू शकतात.

   

M3, M3 Pro , M3 Max चिप

Apple ने Scary Fast इव्हेंट मध्ये (Apple Scary Fast Event) अप्रतिम लक्झरी मॉडेल्स सोबत नवीन टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेली M3 चिप लॉन्च केले. ही पहिली पर्सनल कम्प्युटर चीप आहे. या चिपला इंडस्ट्रीने 3 नॅनोमीटर प्रोसेसर टेक्निक् चा वापर करून डेव्हलप केले आहे. ही लॉन्च केलेली  M3 चिप M1 चिप पेक्षा 50 पटीने आणि M2 चीप पेक्षा 30 पटींनी वेगवान आहे. एवढेच नाही तर M3 MAX ही चीप Intel चीपच्या तुलनेमध्ये तब्बल 11 पटींनी वेगवान असल्याचं कंपनीने सांगितलं. Apple ने लॉन्च केलेल्या M3 चिप मध्ये M3, M3 Pro आणि M3 Max हे तीन वर्जन उपलब्ध आहेत.

New Macbook Pro

कॅरी फास्ट इव्हेंट मध्ये Apple ने Macbook Pro चे दोन नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. आता Macbook Pro 14 इंच मध्ये M3 चिपसेट सह मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा मॅकबुक रोजच्या कामासाठी तसेच गेम खेळण्यासाठी सुद्धा चांगला उपयुक्त आहे . या Macbook Pro मध्ये नवीन कलर ऑप्शनसह मॅजिक कीबोर्ड, मॅजिक ट्रॅकपॅड, मॅजिक माउस यासारखे फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. या Macbook Pro ची बॅटरी तब्बल 22 तासांसाठी बॅकअप देते. या मॅकबुकच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर 14 इंच Macbook Pro ची किंमत 1599 डॉलर आणि 16 इंच Macbook Pro ची किंमत 1,999 डॉलर्स एवढी आहे.

New iMac– Apple Scary Fast Event

कॅरी फास्ट इव्हेंट मध्ये कंपनीने मॅकबुक प्रो सोबतच M3 चिप सह iMac देखील लॉन्च केला. हा iMac 24 इंच डिस्प्ले सह उपलब्ध करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 4.5 K रेटिना, 11.3 मिलीयन पिक्सेलसह बिलियन कलर्स ऑफर करतो. यामध्ये 24 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज उपलब्ध आहे. या iMac च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर हा 1,299 डॉलर किमतीमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या iMac ची प्री बुकिंग आज पासून सुरू झाली आहे.