31 ऑक्टोबरला Apple आयोजित करणार ‘Scary Fast’ इव्हेंट

टाइम्स मराठी । Apple ब्रँड चे प्रोडक्ट तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. त्याचप्रमाणे Apple कंपनीने नुकताच Iphone 15 सिरीज लाँच केली. आता Apple कंपनीकडून आणखीन काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येऊ शकतात. यासाठी कंपनी 31 ऑक्टोबरला Scary Fast नावाने एक इव्हेंट आयोजित करत आहे. नुकताच Apple ने एक्स म्हणजेच ट्विटर वर इव्हेंटचा टीझर व्हिडीओ शेअर केला. हा प्री रेकॉर्डेड इव्हेंट 31 ऑक्टोबरला सकाळी 5.30 मिनिटांनी कंपनीच्या अधिकारीक वेबसाईट, युट्युब चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहता येईल.

   

Apple कंपनीच्या वेबसाईटवर जारी केलेल्या एका ॲनिमेशनमध्ये ॲपल लोगो फाईंडर आयकॉन मध्ये बदलताना दिसत आहे. म्हणजेच नवीन मॅकबुक लॉन्च होण्याची शक्यता आहे. ब्ल्यूमबर्ग रिपोर्टनुसार, एप्पल कंपनीकडून या इव्हेंट मध्ये M2/ M3 प्रोसेसर सह 24 इंच iMac चे रिफ्रेश व्हर्जन लॉन्च करण्यात येऊ शकते. त्याचबरोबर या इव्हेंट मध्ये 14 इंच आणि 16 इंच च्या MACKBOOK PRO ची घोषणा देखील केली जाऊ शकते. हा मॅकबुक 3nm M3 pro आणि M3 Max चिप्स वर काम करतील.

लॉन्च होणाऱ्या मॅकबुक प्रो मध्ये नवीन चिपसेट उपलब्ध करण्यात येऊ शकतात. या नेक्स्ट जनरेशन एप्पल सिलिकॉन चिप्स मध्ये 16 CPU कोर आणि 40 GPU कोर उपलब्ध करण्यात येऊ शकतात. हे सेकंड जनरेशन एप्पल सिलिकॉन च्या तुलनेमध्ये अप्रतिम आणि पावरफुल असतील. हे नवीन मॅकबुक  जुन्या डिझाईन मध्ये लॉन्च करण्यात येऊ शकतात. या मॅकबुक मध्ये परफॉर्मन्स पॉवर या सोबतच जास्त बदल दिसणार नाहीत.