चुकीचा USB Type- C वापरल्यास खराब होईल iPhone; कंपनीचा इशारा

टाइम्स मराठी । Apple हा भारतीय तरुणांचा आवडता स्मार्टफोन ब्रॅण्ड आहे. मागच्या आठवड्यामध्ये कंपनीने iPhone15 सिरीज लॉन्च केली होती. यामध्ये iPhone 15 plus, iPhone15 pro, iPhone15 pro max हे स्मार्टफोन कंपनीने लॉन्च करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु आता ॲपल कंपनीने iPhone युजर्सला अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर पाहूया

   

iPhone15 लॉन्च झाल्यानंतर युजर्सला प्रचंड आनंद झाला होता. कारण या आयफोन सिरीजमध्ये बदल करून USB Type- C कनेक्टिव्हिटी पोर्ट चार्जर देण्यात आले होते. जेणेकरून कोणत्याही Type- C चार्जरने हा स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो. परंतु आता एप्पल कंपनीने अलर्ट राहण्याचा इशारा देत सांगितले की, चुकीचे USB Type- C केबल्स आणि अडॉप्टर वापरल्यामुळे आयफोन 15 चे संपूर्ण मॉडेल्स खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजे युजर कोणत्याही अँड्रॉइड फास्ट चार्जरने आयफोन चार्ज करू शकत नाही. नवीन लॉन्च करण्यात आलेल्या आयफोन 15 मॉडेल्स मध्ये युनिवर्सल यूएसबी टाईप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आयफोन 15 हा जुन्या चार्जरने चार्ज होऊ शकत नाही. आणि कंपनीने यासोबत चार्जर अडॉप्टर देखील दिलेले नाही.

Apple ने कार्बन न्यूट्रल बनण्याचा आणि ई वेस्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयफोन 15 ने बॉक्समध्ये चार्जिंग अडॅप्टर दिले नाही. ज्यामुळे युजर्स ला वेगळे अडप्टर खरेदी करावे लागेल . या बॉक्समध्ये एक USB Type- C, टू USB Type- C केबल आणि डिवाइस कंपनीकडून देण्यात आले आहे. परंतु कंपनीच्या बॉक्समध्ये अडप्टर देण्यात आलेला नाही. आणि चार्ज करण्यासाठी ॲडॉप्टर ची गरज असते. त्यामुळे आता युजर्सला एप्पल च्या 15 सिरीज साठी चार्जरॲडॉप्टर स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल.