Apple ने Watch Series 9 रेड कलर ऑप्शनसह केली लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Apple ने रेड कलर ऑप्शन मध्ये Apple Watch Series 9 लॉन्च केली आहे. HIV आणि AIDS विरुद्ध ग्लोबल फाईटला पाठिंबा देण्यासाठी Apple ने ही सिरीज लॉन्च करण्यात आली. Apple कंपनी लाल कलर ची स्मार्टवॉच  विक्री केल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे  HIV आणि AIDS विरुद्ध लढ्याच्या समर्थनार्थ दान करणार आहे. आज आपण या स्मार्टवॉचचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

बॅटरी

Apple Watch Series 9 मध्ये लाल ॲल्युमिनियम केस आणि मॅचिंग लाल स्पोर्ट ब्रँड देण्यात आले आहे. या रेड वॉच सोबत नवीन रेड वॉच फेस देखील उपलब्ध करण्यात येतील. AIDS दिवसाच्या निमित्त या वॉचला अनुकूलित सोलर एनालॉग वॉच फेसेस मिळतील. या वॉच मध्ये S9 चिप आणि क्वाड कोर न्यूरल इंजिन देण्यात आले आहे. जेणेकरून यूजर्सला वॉच मध्ये जलद प्रोसेसिंग आणि अप्रतिम परफॉर्मन्स मिळेल. यामध्ये  देण्यात आलेली बॅटरी 18 तासापर्यंत बॅटरी लाइफ प्रदान करते.

फिचर्स

Apple Watch Series 9 या वॉच मध्ये डबल टॅब जॅस्चर फीचर देण्यात आले आहे. या फिचरच्या माध्यमातून वॉच स्क्रीनला टच न करता बरेच काम पूर्ण होऊ शकतात. कंपनीने हे वॉच RED सोबतच बऱ्याच कलर ऑप्शनसह उपलब्ध केलं आहे. त्यानुसार तुम्ही हे वॉच रिटेल स्टोअर वरून वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतात. 

किंमत किती?

लाल कलर मध्ये उपलब्ध असलेल हे वॉच APPLE च्या ऑनलाइन स्टोअर वर देखील उपलब्ध आहे. कंपनीने या वॉच ची किंमत भारतात 41,900 ठेवली असून हे स्मार्ट वॉच खरेदी केल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे HIV आणि AIDS कार्यक्रमासाठी ग्लोबल फंड म्हणून दान केले जाणार आहे.