ठरलं तर मग! उद्या iPhone 15 सीरीजसह Apple करणार ‘या’ गॅजेटचेही लॉन्चिंग

TIMES MARATHI | अखेर उद्या Apple कंपनी आपली iPhone 15 सीरीज लाँच करणार आहे. iPhone15 लॉन्चिंग इव्हेंटला Apple कंपनीने वंडरलस्ट असे खास नाव दिले आहे. या इव्हेंटमध्ये आयफोन शिवाय Apple इतरही गॅजेट लॉन्च करणार आहे. त्यामुळे अनेकजण या इव्हेंटची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर उद्या भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता वंडरलस्ट लॉन्चिंग इव्हेंटला सुरुवात होणार आहे. हा लॉन्चिंग iPhone 15 खरेदीदारांसाठी सर्वात महत्त्वाचा असेल.

   

इव्हेंटमध्ये 4 आयफोन लॉन्च

भारतात Apple चे गॅजेट वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरेदीदार iPhone 15 लॉन्च होण्याची वाट पाहत होते. उद्या त्यांची ही आतुरता संपणार आहे. मुख्य म्हणजे, उद्याच्या इव्हेंटमध्ये कंपनी 4 iPhone लॉन्च करणार आहे. यामध्ये, iPhone 15, 15 Plus, 15 Pro आणि 15 Pro Max अशा चार आयफोनचा समावेश असेल. या नवीन सिरीज मधून कंपनी ग्राहकांना अनेक नवीन अपडेटेड वर्जन, फीचर्स, मॉडेल उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे शक्यतो कंपनी, उद्याच्या इव्हेंटमध्ये प्रो मॅक्स ऐवजी अल्ट्रा नाव वापरू शकते.

iPhone 15 ची भारतीय किंमत

नवीन आयफोनमध्ये एप्पल कंपनी यूएसबी टाईप-सी चार्जर, दमदार बॅटरी, प्रो मॉडेल्समध्ये चांगली झूम क्वालिटी, पेरिस्कोप लेन्स आणि फास्ट चार्जिंग अशा सुविधा देईल. उद्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये चारही आयफोनच्या किमती प्रदर्शित केल्या जातील. यामध्ये, iPhone 15 ची भारतीय किंमत 80 हजार किंवा त्यापुढे ठरवली जाऊ शकते.

Apple च्या ‘या’ गॅजेटचे होणार लॉन्चिंग

iPhone 15 सोबत एप्पल कंपनी इतर काही गॅजेटचे देखील लॉन्चिंग करणार आहे. त्यामध्ये, iOS 17, iPadOS 17 आणि watchOS 10 अशा गॅजेट्सचा समावेश असेल. इतकेच नव्हे तर, कंपनी USB Type-C चार्जरसह AirPods Pro लॉन्च करू शकते. ज्यामध्ये कोणतेही हार्डवेअर अपडेट मिळणार नाहीत. उद्याच्या इव्हेंटमध्ये बऱ्याच नवीन गॅजेट्सची माहिती कंपनीकडून देण्यात येऊ शकते.