टाइम्स मराठी | काही महिन्यांपूर्वी भारतात Tata कंपनी Iphone डेव्हलप करणार असल्याची बातमी आली होती. त्यानुसार आता भारतामध्ये आयफोन डेव्हलप करण्यात येणार आहे हे नक्की. पण आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, Apple भारतात वर्षाला 5 कोटी आयफोन बनवणार आहे. आणि यासाठी कंपनीने तयारी देखील सुरू केली आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षांमध्ये हे शक्य होईल असा दावा देखील या जर्नलमध्ये करण्यात आला. असं झाल्यानंतर जगात एकूण Iphone पैकी 25% आयफोन हे मेड इन इंडिया असतील.
मागच्या आर्थिक वर्षांमध्ये Apple कंपनीने भारतात 58000 कोटींपेक्षा जास्त किमतींची Iphone असेंबल केले होते. यासोबतच Apple साठी आयफोन बनवणारी प्रमुख कंपनी फॉक्सकॉनने मागच्याच महिन्यामध्ये भारतात 13000 कोटींची गुंतवणूक करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आता कर्नाटकातील फॉक्सकॉन फॅक्टरी मध्ये पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 यावर्षी एप्रिल महिन्यात उत्पादन सुरू करण्यात येईल. या सोबतच कंपनी दुसरी फॅक्टरी देखील उभारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
टाटा कंपनी देखील आयफोन निर्मिती करण्यासाठी तमिळनाडूमध्ये कारखाने सुरू करण्याची योजना आखत आहे. यासाठी टाटा ग्रुपने कर्नाटकातील विस्ट्रॉंग फॅक्टरी देखील विकत घेतली आहे. दोन वर्षांमध्ये 20 असेंबली लाईन सुरु करण्यात येणार असून 50,000 कर्मचारी या ठिकाणी असतील असं टाटा कडून सांगण्यात आलं आहे. म्हणजेच आता भारतात एप्पल सोबतच टाटा देखील आयफोन निर्मिती करेल.
Iphone बनवण्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2023 24 या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यात भारतातून 5.5 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त किमतीचे मोबाईल निर्यात करण्यात आले होते. यामध्ये Iphone चा देखील सर्वात मोठा भाग होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग ही कंपनी होती. आता पुढच्या वर्षी देखील या ही पेक्षा जास्त आयफोन निर्यात केले जाऊ शकतात.