खुशखबर! अखेर आज Apple ची SmartWatch 9 Series लॉन्च; फ्री ऑर्डरींगला 15 सप्टेंबरपासून सुरुवात

TIMES MARATHI | आज अँपल कंपनीने स्मार्टवॉच 9 सिरीज लॉन्च केली आहे. एप्पल कंपनीची ही लेटेस्ट स्मार्टवॉच असणार आहे. या स्मार्टवॉच 9 सिरीजची किंमत 41,900 रुपये एवढी आहे. या स्मार्टवॉच सिरीजसोबतच कंपनीने वॉच अल्ट्रा 2 ही स्मार्ट वॉच देखील लॉन्च केली असून त्याची किंमत 29,900 रुपये एवढी आहे. ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून फ्री ऑर्डर सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 22 सप्टेंबर पासून ऑफिशियल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणि रिटेल स्टोअर वर उपलब्ध होईल. जाणून घेऊया स्मार्टवॉच सिरीजमधल्या लेटेस्ट स्मार्टवॉचचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

अँपल स्मार्टवॉच 9 सिरीजमध्ये रेडीनो डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2000 निट्स ब्राईटनेस प्रदान करतो. स्मार्टवॉच 8 सिरीज पेक्षा या 9 सिरीज मध्ये दुप्पट ब्राईटनेस प्रदान करण्यात आला आहे. या सिरीज मध्ये S9 चिपसेट उपलब्ध असून हा चिपसेट 8 सिरीज पेक्षा 60 टक्के जास्त पावरफुल आहे. या 9 सीरिजमध्ये ब्राईट डिस्प्ले आणि नवीन डबल टॅप इनपुट सिस्टीम वापरण्यात आले आहे.

अँपल स्मार्टवॉच 9 सिरीज या स्मार्टवॉचला टच केल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर केली जाऊ शकते. यामध्ये एक्सलेरोमिटर, गाइरोस्कोप आणि सेकंड सेंसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. ही स्मार्टवॉच डबल टॅपसह उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे दोन बोटं स्मार्टफोनवर टच करावे लागतील. कंपनीने दिलेल्या या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला कॉल एंड आणि पिक करणे सोपे जाईल.

अँपल स्मार्टवॉच 9 सिरीजमध्ये 18 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. ही स्मार्टवॉच नेमड्रॉपला देखील सपोर्ट करते. यामध्ये नवीन अल्ट्रा वाईडबँड चीप देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्ले लिस्ट लगेच प्ले होऊ शकते. जर तुम्ही देखील ही स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला स्टार लाईट सिल्वर मिड नाईट आणि रेड कलर ऑप्शनमध्ये स्मार्टवॉच मिळू शकते.