Aprilia RS 457 बाईक लॉन्च; 4.10 लाख रुपयांत उपलब्ध 

Aprilia RS 457 । गोवा येथे सुरू करण्यात आलेल्या इंडिया बाईक विक 2023 इव्हेंट मध्ये वेगवेगळ्या ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या बाईक्स लॉन्च करत आहे. त्यानुसार आता इटालियन ऑटो मेकर कंपनी Aprilia ने देखील या इव्हेंट मध्ये नवीन बाईक लॉन्च केली आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या बाईकचे नाव Aprilia RS 457 आहे. कंपनीने या बाईकची एक्स शोरूम किंमत 4.10 लाख रुपये ठेवली आहे. गाडीचा लूक बघितला तर ही बाईक पूर्णपणे  Aprilia RS 660 प्रमाणे दिसते. आज आपण जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

डिझाईन

Aprilia RS 457 या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, ही बाईक अत्यंत अग्रेसिव्ह लूक मध्ये दिसते. यामध्ये पारदर्शी वायझर सोबतच एक प्लेट LED हेडलाईट सेटअप यात देण्यात आले आहे. यासोबतच एयरोडायनामिक्स साठी कट आणि क्रीज सह शार्प बॉडी पॅनल आणि स्प्लिट सीट सेटअप यामध्ये मिळतोय.

फिचर्स– Aprilia RS 457

Aprilia RS 457 या बाईक मध्ये 5 इंच  TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्लिप ऑन हँडलबार, बॅकलिट स्विचगिअर, टू इन वन अंडरबेली एक्झॉस्ट देण्यात आले आहे. कंपनीने या बाईकमध्ये तीन रायडिंग मोड उपलब्ध केले आहे. या बाईक मध्ये देण्यात आलेल्या ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये चार पिस्टन रेडियल कॅलिपर्स सह 320 mm फ्रंट डिस्क आणि दोन पिस्टन  स्लाइडिंग कॅलिपर्स  सह 220 mm रियल डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच सुरक्षेसाठी ड्युअल चॅनेल ABS असिस्ट देखील मिळतो.

 इंजिन

Aprilia RS 457 या बाईकमध्ये 457cc लिक्विड कुल्ड, पॅरेलल ट्वीन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 9400 RPM वर 46 BHP पावर आणि 6700 RPM वर 43.5 NM पीक टॉर्क जनरेट करतो. या बाईक मध्ये  DOHC इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लच सह 6 स्पीड गिअरबॉक्स सुसज्ज करण्यात आले आहे. या बाईक मध्ये कंपनीने 13 लिटरचा फ्युएल टॅंक दिला आहे. 

 सस्पेन्शन

या बाईकच्या फ्रंट मध्ये 41mm इन्वर्टेड सस्पेन्शन सह ट्वीन स्पार अल्युमिनियम फ्रेम आणि रियल मध्ये मोनोशॉक देण्यात आले आहे. यासोबतच बाईक मध्ये स्लिप क्लच आणि एक क्विक शिफ्टर देखील मिळते. गाडीचे वजन 175 किलोग्रॅम एवढे असून सीटची उंची 457 800 mm आहे. ही नवीन लॉन्च करण्यात आलेली बाईक प्रिज्मेटिक डार्क, ओपलसेंट लाईट आणि रेसिंग स्ट्राईप मध्ये उपलब्ध आहे.