टाइम्स मराठी । भारतात आणि विदेशात जास्त प्रमाणात झळकनारी Aprilia ही एक इटालियन बाईक कंपनी असून सुरुवातीला या कंपनीने स्कूटर आणि लहान क्षमतेच्या मोटर सायकल बनवण्यापासून सुरुवात केली होती. आणि आता काही वर्षांपूर्वी Aprilia ने 1,000 cc V-ट्विन RSV Mille आणि V4 RSV4 या स्पोर्टबाईकचे उत्पादन केले होते आणि आता Aprilia ने एक धमाकेदार बाईक लॉन्च केली आहे. Aprilia RS 457 असे या गाडीचे नाव असून या बाईकमुळे स्पोर्ट सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा वाढलेली पाहायला मिळेल. ही बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये केटीएम आरसी 390, कावासाकी निंजा 400, यामाहाची अपकमिंग बाईक YZF R3 या बाईकला टक्कर देईल. आज आपण या बाईकचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.
डिझाईन आणि लुक
Aprilia RS 457 ही बाईक पूर्णपणे शार्प आणि आकर्षक बनवण्यात आली आहे. ही पूर्वी फेयर स्पोर्ट बाईक असून कंपनीने या बाईक मध्ये LED ब्रेक लाईट इंडिकेटर्स आणि एक शार्प रियर एन्ड देखील दिले आहे. Aprilia RS 457 या स्पोर्ट बाईकचा समोरील भाग हा RS660 आणि RSV 4 या बाईकसारखा बनवण्यात आला आहे. या स्पोर्ट बाईक मध्ये समोरील साईडने LED DRL असेंबली आणि एलईडी हेडलाईट देण्यात आले आहे. त्याचबरोबर हाफ हॅन्डबार आणि बॅक लिटला कंट्रोल देण्यात आलाय. Aprilia RS 457 या स्पोर्ट बाईकमध्ये सिल्वर फिनिशिंग असलेली अल्युमिनियम फ्रेम वापरण्यात आली आहे.
इंजिन – Aprilia RS 457
Aprilia RS 457 या स्पोर्ट बाईक मध्ये ट्वीन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन ड्युअल वॉल टायमिंग आणि लिक्विड कुलिंग यासह भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आले. हे इंजिन सहा स्पीड गिअर बॉक्सला जोडण्यात आले असून 47 hp पावर जनरेट करते.
ब्रेकिंग सिस्टीम
Aprilia RS 457 या स्पोर्ट बाईकमध्ये कंपनीने फ्रंट डिस्क आणि 41mm यूएसडी फोर्क्सवर प्रीलोड ऍडजस्टमेंट केली आहे. यामध्ये मोनो शॉक एब्जॉर्बर देखील वापरण्यात आले आहे. कंपनीने या स्पोर्ट बाईकच्या फ्रंट टायर मध्ये 110/ 70 सेक्शन आणि बॅक टायर मध्ये 150/60 सेक्शन उपलब्ध करून दिले आहे. या बाईक मध्ये 17 इंच अलॉय व्हील, समोर 320 mm डिस्क आणि पाठीमागे 220 mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. यामध्ये देण्यात आलेली ड्युअल डेस्क सिस्टीम या बाईकला खास बनवते. गाडीच्या किमतीबाबत मात्र कंपनीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.