440cc इंजिन, 180 KMPH टॉप स्पीड; भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार ‘ही’ दमदार Sport Bike

टाइम्स मराठी । भारतात आणि विदेशात जास्त प्रमाणात झळकनारी एप्रिलिया ही एक इटालियन स्पोर्ट बाईक कंपनी असून सुरुवातीला या कंपनीने स्कूटर आणि लहान क्षमतेच्या मोटर सायकल बनवण्यापासून सुरुवात केली होती. आणि आता काही वर्षांपूर्वी एप्रिलियाने 1,000 cc V-ट्विन RSV Mille आणि V4 RSV4 या स्पोर्टबाईकचे उत्पादन केले. यानंतर आता कंपनी लवकरच 2024 मध्ये आपली RS440 ही बाईक भारतीय बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.

   

फीचर्स –

नुकताच काही दिवसांपूर्वी भारत आणि विदेशात झळकलेली ही बाईक फक्त कलर डिफरन्स मध्ये दिसली. एप्रिलिया RS440 ही बाईक RS660 सोबत इन्स्पायर असून यात एलइडी हेडलाईट देण्यात आले आहे. या बाईकमध्ये क्लीनर डिजाइन सोबतच एक अंडरबेली एग्जॉस्ट सिस्टम देण्यात आलेला असून USD फोर्क्स आणि रियर मध्ये मोनो-शॉक देण्यात आला आहे. त्याचबरोबर डुअल-चैनल एबीएस आणि 17-इंच व्हील देखील उपलब्ध आहे.

440cc इंजिन –

गाडीच्या इंजिन बाबत सांगायचं झाल्यास, अप्रिलिया RS440 मध्ये 440cc पॅरेलल ट्वीन लिक्विड-कूल्ड इंजन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअर बॉक्सला जोडलेले असून 48bhp पॉवर जनरेट करतो. गाडीची अजून एक खास गोष्ट म्हणजे RS440 ही स्पोर्ट बाईक तब्बल 180 किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड देते.

किंमत किती?-

अप्रिलिया RS440 बाइकच्या किंमती बद्दल बोलायचं झालं तर या जबरदस्त स्पोर्ट बाईकची एक्स शोरूम किंमत 4 लाख रुपये एवढी असू शकते. भारतीय बाजारात अप्रिलिया RS440 ही बाईक यामाहा, KTM, RC390 आणि कावासाकी निंजा 400 या बाईक ला टक्कर देऊ शकते.