अंतराळात सापडला ‘कुबेरचा खजिना!! सर्वजण करोडपती होणार; NASA पाठवणार यान

टाइम्स मराठी । जगात प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी धडपड करत असतो. परंतु असे व्यक्ती देखील या जगात आहेत, जे काहीही धडपड न करता श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असतात. त्याच प्रकारे ते स्वप्न पाहतात की अशी एखादी वस्तू त्यांच्या हातात लागावी ज्यामुळे ते स्वतः अरबपती होऊ शकतील. आता हे स्वप्न सत्यात उतरेल की काय असं वाटत आहे. कारण अंतराळ मध्ये शास्त्रज्ञांच्या हाती अशी गोष्ट लागली आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील सर्वजण अरबपती बनतील. तुम्ही याला कुबेर चा खजाना देखील म्हणू शकतात.

   

डेली स्टार च्या रिपोर्टनुसार मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान अंतराळामध्ये एक अशी उल्का सापडली आहे, जी अत्यंत मौल्यवान असून मानवांच्या विचारांच्या पलीकडील आहे. खरंतर अशा उल्का पिंड चा एक तुकडा सुद्धा खूप किमती असतो, पण हा एसट्रेरॉईड खरंच एखाद्या खजिनाच्या घड्यापेक्षा देखील मौल्यवान आहे. शास्त्रज्ञांच्या मते या मौल्यवान उल्केचा एक तुकडा जरी पृथ्वीवर पोहोचला, तर प्रत्येक माणूस हा श्रीमंत बनू शकेल.

ही मौल्यवान उल्का लोह, निकेल आणि सोन्यासारख्या धातूंनी बनलेली असून त्याची किंमत मोजली तर पृथ्वी नुसार 10,000 क्विंटलियन अमेरिकन डॉलर्स मध्ये येईल. LadBible यांच्या रिपोर्टनुसार, हा 10,000 क्विंटलियन अमेरिकन डॉलर्स चा खजिना हाती लागला तर 8 बिलियन लोकसंख्या असलेल्या या जगात प्रत्येक व्यक्तीकडे 1 ट्रिलीयन पाउंड म्हणजेच 1000 अरब यापेक्षा कमी काहीच नसेल. हे सत्यात उतरवण्यासाठी नासा आणि अंतराळ संस्थेने मिशन सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

या मिशनसाठी नासाने एक स्पेस क्राफ्ट तयार केला आहे. हे स्पेस क्राफ्ट या किमती उल्काची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु तुम्ही फुकटात श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू नका. या मिशनमध्ये नासा ही उल्का आणण्यासाठी नाहीतर असे ग्रह कशाप्रकारे बनतात, त्यांची रचना कशा प्रकारे आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी 5 ऑक्टोबरला कॅनोडी स्पेस सेंटर मधून स्पेसक्राफ्ट सोडण्यात येणार आहे. नासाच्या वेबसाईट नुसार या उल्कापिंडाची रचना वेगळी असून यामध्ये लोखंडी कोर बाहेर आल्याचे दिसत आहे. जे आपल्या सौरमालेच्या पुढे ब्लॉक बनवत आहे. ही उल्का 2.5 अब्ज मैल अंतरावर असून या ठिकाणी पोहोचण्यासाठी 6 वर्षे लागू शकतात.