अरे व्वा!! सोने- चांदीने भरलेला लघुग्रह सापडला; आता सगळेच होणार अब्जाधीश

टाइम्स मराठी । ISRO आणि NASA च्या माध्यमातून सतत वेगवेगळे शोध लावले जातात. अंतराळात काय सुरू आहे, कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर पाणी उपलब्ध आहे. अशा सर्व गोष्टींचा शोध नासा आणि इस्रो घेत असतात. नासाच्या या शोधमोहिमेला मोठं यश मिळालं आहे. कारण नासाला एक असा लघुग्रह सापडला आहे ज्यावर सोने- चंदीसह अनेक मौल्यवान वस्तूंचा साठा आहे. हा साठा पृथ्वीवर येताच सर्वच जण अब्जाधीश होतील.

   

या लघुग्रहावर जाण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक खास मोहीम आखली आहे. या लघुग्रहावर मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे उघड झालं असून या धातूमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकतो. या लघुग्रहाचे नाव 16 सायकी असं असून नासाने या मोहिमेला सायकी असे नाव दिले आहे. नासाचे हे मिशन 5 ऑक्टोंबरला भारतीय वेळेनुसार आठ वाजून चार मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण अमेरिकेतील फ्लोरीडा येथील कॅनडी स्पेस सेंटर मधून करण्यात येईल. स्पेस एक्सच्या फाल्कन हेवी रॉकेट मधून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

किती दूर आहे हा लघुग्रह –

धातूंनी भरलेला हा ग्रह पृथ्वीपासून 3.6 अब्ज किलोमीटर एवढा दूर आहे. त्यानुसार हे यान पोहोचण्यासाठी सहा वर्षे लागतील. म्हणजे संपूर्ण सहा वर्षे नासाचे यान प्रवास करेल. हे सायकी अंतराळयान पहिले दोन वर्ष पृथ्वीभोवती फिरणार आहे. त्यानंतर हळूहळू बरेच टप्पे पार करत 16 सायकी पर्यंत पोहोचणार आहे. हा लघुग्रह मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान सूर्याभोवती फिरत असतो असं शास्त्रज्ञांचं मत आहे. या लघुग्रहावर असलेले धातूंचे मूल्य अंदाजे 700 क्विंटलियन डॉलर्स एवढे असू शकते. ही रक्कम जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटली तर किमान सात लाख कोटी रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील. 5 ऑक्टोंबर पासून हे अभियान सुरू होत असून यामध्ये खाणकामाची कोणतीच योजना आखण्यात आलेली नाही. फक्त त्याच्या गाभ्याचा शोध घेतला जाणार आहे असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

16 सायकी या लघुग्रहाचा शोध 1852 मध्ये लावण्यात आला होता. हा शोध इटालियन अंतराळवीर ऍनिबेल डीगँस्पॅरिस यांनी लावला होता. शास्त्रज्ञांच्या मते हा लघुग्रह 226 किलोमीटर रुंद आहे. नासाला या लघुग्रहाच्या रचनेची पृथ्वी सोबत तुलना करायची आहे. एरिझोना युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर लिंडी एल्कीन्सच्या यांनी माहिती देत एका अहवालामध्ये सांगितलं की, 16 सायकी सूर्याभोवती पाच वर्षांमध्ये आपली परिक्रमा पूर्ण करत असतो. या लघुग्रहाचा एक दिवस साधारण चार तासांचा असतो.