Aston Martin DB12 लक्झरी कार भारतात लाँच; लूक पाहूनच म्हणाल, क्या बात है!!

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रिटिश लक्झरी कार निर्माता एस्टन मार्टिनने आपली नवीन मास्टर पीस Aston Martin DB12 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. या कारला सुपर टूरर असे देखील म्हटलं जातं. ही नवीन लॉन्च करण्यात आलेली कार पूर्वीचे मॉडेल DB 11 ला रिप्लेस करते. भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या एस्टन मार्टिन ही कंपनी DBX कारची विक्री करते. DBX ही कार विदेशात आणि भारतात देखील अत्यंत लोकप्रिय आहे. या DB 12 कारची किंमत 4.59 करोड रुपये एवढी आहे.

   

डिझाईन

Aston Martin DB12 च्या लूक बाबत सांगायचं झाल्यास, अतिशय स्पोर्टी आणि आकर्षक असा लूक तुम्हाला पाहायला मिळेल. गाडी पाहताच तुम्ही म्हणाल, अरे वा क्या बात है!! या नवीन कार मध्ये मोठे ग्रील देण्यात आले असून ते खूप अग्रेसिव्ह देखील दिसतात. यासोबतच या कारमध्ये नवीन एलईडी लाईट्स, जाळीदार 21 इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे. गाडीच्या इंटिरियर मध्ये जास्त लक्झरी आणि अतिरिक्त टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही कार अत्याधुनिक आणि आकर्षक दिसतेय. या नवीन कार मध्ये मोठा बूट स्पेस उपलब्ध असून आरामदायक रित्या गाडीतून मधून आत आणि बाहेर निघणे सोपे होते.

इंजिन – Aston Martin DB12

Aston Martin DB12 मध्ये 4.0 ट्वीन टर्बो V8 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 671 BHP पावर आणि 800 nm पिक टॉर्क जनरेट करते. DB 12 मध्ये वापरण्यात आलेले इंजन DB11 पेक्षाही पावरफुल आहे. या इंजिन सोबत आर्ट स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीने इलेक्ट्रॉनिक रियर डिफरेंशिअल देखील दिले आहे.

फीचर

Aston Martin DB12 मध्ये 10.25 इंच स्क्रीन सह इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आले आहे. ही सिस्टीम वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. त्याचबरोबर यामध्ये सर्व टच कंट्रोल देण्यात आलेले नसून गिअर सिलेक्टर, ड्राईव्ह सेलेक्टर, हीटिंग, व्हेंटिलेशन या सर्व गोष्टींसाठी फिजिकल बटन देण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये स्टॅंडर्ड 390 w 11 स्पीकर ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच बोवर्स अँड विल्किंस हे ऑप्शन देखील या काळामध्ये देण्यात आले आहे.