Astrology : ज्योतिष शास्त्राप्रमाणे घरात कुत्रा पाळणं शुभ की अशुभ? कोणत्या ग्रहांवर काय परिणाम होतो?

Astrology । बऱ्याच जणांना घरात कुत्रे पाळणे आणि त्याचा सहवास आवडत नसतो. तर याला अपवाद म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुत्र्याबद्दल संवेदनशीलता सुद्धा दिसून येते. लहान मुले असतील, त्यांना आपण आपल्या घरामध्ये एक छोटसं कुत्र्याचे पिल्लू आणावं असं वाटत असतं. ते त्याच्याबद्दल फार संवेदनशील असतात. पण घरातील मोठ्या माणसांना कुत्रे पाळणे म्हणजे आपल्याला रेबीज होईल की काय अशी भीती वाटत असते. पण ज्योतिषांच्या म्हणण्याप्रमाणे घरात कुत्रा पाळणं हे शुभ की अशुभ हे आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

   

ज्योतिष शास्त्राच्या म्हणण्यानुसार कुत्रा पाळल्याने घरातील अशुभ गोष्टींपासून आपली रक्षा होते. त्यामुळे घरात कुत्रा पाळणं हे शुभच आहे. त्याचबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कुत्र पाळण्याचा पूर्ण प्रभाव आपल्या ग्रह नक्षत्रांवर, कुंडलीवर होत असतो. त्यामुळे जर तुम्ही कुत्र पाळत असाल तर त्याची चांगली सु- व्यवस्थित देखभाल करा. म्हणजे तुम्ही कुत्र्याची चांगली देखभाल केल्यावर तुमच्या नक्षत्रांमध्ये चांगला प्रभाव पडेल.

कुत्र्याला भगवान भैरव यांचं वाहन म्हंटले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये कुत्र्यासंबंधी नक्षत्रांमध्ये काही संबंध लावण्यात आलेले आहे. त्यानुसार कुत्र्याचा शनी राहू आणि केतू या नक्षत्रांमध्ये अहम संबंध असतो. जर तुम्ही कुत्रा पाळत असाल तर तुमच्या घरातील लोकांचा राहू चांगला आणि तुमचा परिवार देखील सुखी राहू शकतो.