Astrology : सावधान! चंद्र आणि राहूची होणार युती; या राशींच्या व्यक्तींसाठी पुढील 48 तास आहेत कठीण

Astrology । वैदिक शास्त्रानुसार, चंद्र कोणत्याही राशीमध्ये अडीच दिवसांपेक्षा जास्त राहत नाही. चंद्र लगेच राशी बदल करतो. अशातच आता 22 नोव्हेंबरला चंद्रग्रहणे मीन राशि मध्ये गोचर करणे सुरु केले आहे. मीन राशि मध्ये अगोदर पासूनच राहू ग्रह उपस्थित आहे. चंद्र मीन राशि मध्ये 24 नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी विराजमान होईल. राहूदेखील मीन राशि मध्ये असल्यामुळे चंद्र आणि राहू यांच्यामध्ये युती बघायला मिळत आहे. चंद्र आणि राहू यांच्या युतीमुळे ग्रहण योग निर्माण होत आहे. ग्रहण योगामुळे काही राशींसाठी पुढचे 48 तास हे कठीण असू शकतात.

   

ज्योतिष शास्त्रानुसार, राशी परिवर्तन, ग्रहांची युती, गोचर या सर्व गोष्टींचा प्रभाव राशींवर पडत असतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ पद्धतीने दिसतो. चंद्र आणि राहू यांच्या युतीमुळे तयार होणाऱ्या ग्रहण योगाचा  अशुभ प्रभाव काही राशींवर दिसणार आहे. या अशुभ प्रभावामुळे या राशींच्या व्यक्तींना  सावधगिरी बाळगावी लागेल.  जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी

१) मेष

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)चंद्र आणि राहू यांच्या युतीमुळे ग्रहण योग निर्माण होत आहे. या ग्रहण योगाचा परिणाम मेष राशींच्या व्यक्तींवर दिसून येईल. या योगामुळे मेष राशींच्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये द्वादश भाव बनत आहे. या द्वादश भावला व्यय भाव म्हणून देखील ओळखले जाते. मेष राशीच्या व्यक्तींना पुढच्या अडीच दिवसांपर्यंत सावधानी बाळगणे गरजेचे आहे. या अडीच दिवसांपर्यंत मेष राशींचे व्यक्ती  वायफळ खर्चामुळे परेशान राहतील. यासोबतच आरोग्य संबंधित देखील चिंता भासू शकते. मेष राशींच्या व्यक्तींच्या आई-वडिलांना देखील आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. मेष राशींच्या व्यक्तींना अडीच दिवसांपर्यंत व्यवसायामध्ये कोणताच लाभ होणार नाही.

२) सिंह- Astrology

वैदिक शास्त्रनुसार, राहू आणि चंद्र यांच्या युतीमुळे तयार होणारा ग्रहण योग सिंह राशी मध्ये अष्टम भाव तयार होत आहे. त्यामुळे सिंह राशीचे व्यक्ती या अडीच दिवसात आर्थिक मानसिक शारीरिकदृष्ट्या परेशान होऊ शकतात. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात थोडे सांभाळून राहणे गरजेचे आहे. सिंह राशींच्या व्यक्तींनी वाहन चालवताना सावधानी बाळगा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कोणत्याही व्यक्तीला उधार पैसे देऊ नका.

३) धनु

ज्योतिष शास्त्रानुसार, (Astrology) ग्रहण योगामुळे धनु राशींच्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चतुर्थ भाव तयार होत आहे. यामुळे ग्रहण योग धनु राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल नसून बऱ्याच अडचणी या व्यक्तींना येऊ शकतात. या काळामध्ये परिवारातील सदस्यांमध्ये भांडण तंटा होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळामध्ये धनु राशींच्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी सांभाळून राहावे लागेल. यासोबतच अडीच दिवसांपर्यंत धनु राशींच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.