टाइम्स मराठी : जोतिषशास्त्रात (Astrology) शनी हा सर्वात महत्वाचा ग्रह आहे. शनीच्या चालीवरच आपलं भविष्य अवलंबून असत असं बोललं जात. हाचि शनी कधी कधी काही लोकांसाठी शुभ ठरतो, तर काही लोकांचा मात्र बाजार उठवतो. एका ठरविक कालावधीनंतर शनी उदय, अस्त, मार्गक्रमण आणि वक्री होतो. सध्या हा शनी कुंभ राशीत असून 30 जूननंतर तो विक्री चाल करणार आहे. शनीची हि वाकडी चाल 15 नोव्हेंबरपर्यंत राहणार असून या दरम्यान काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या आहेत तेच आज आपण जाणून घेऊयात……
वृश्चिक रास –
पुढच्या पाच महिन्यांसाठी शनी कुंभ राशीत विराजमान होणार असून वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे मार्गी लागतील. कुटुंबाचे सुद्धा सहकार्य या राशींच्या (Astrology) लोकांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र करिअर मध्ये थोड्याश्या चढउताराला सामोरे जावं लागेल.
तूळ रास – Astrology
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्र चाल पुढच्या पाच महिन्यांसाठी फार लाभदायी असणार आहे. शनीच्या शुभ प्रभावांमुळे या राशीच्या लोकांचाय आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसतील. जर तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होण्याची शक्यता आहे. लोकांच्यात तूळ राशीच्या व्यक्तींचा मान- सन्मान मिळेल. मात्र कुठेही पैशाची गुंतवणूक करताना सावधिगिरी बाळगणे आवश्यक आहे.
कन्या रास –
शनी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी पुढचे पाच महिने चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. पैशाच्या बाबतीत तुम्ही मालामाल राहाल. तसेच तुमची रखडलेली कामेही शनीच्या कृपेने पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुद्धा सकारत्मक वातावरण राहून चांगलं कौटुंबिक सहकार्य मिळेल. एकूणच काय तर अगदी आनंदात तुमचं जीवन राहील.