Astrology : ‘या’ बोटात चांदीची अंगठी घातल्यास होतो मोठा लाभ

टाइम्स मराठी । ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) चांदीच्या वस्तू वापरण्यामागे काही महत्त्वाचे कारणे सांगितले आहे. या कारणांनुसार घरात सुख समृद्धी देखील लाभत असल्याचं सांगण्यात येतं. बऱ्याच महिला चांदीचे दागिने वापरत असतात. या दागिन्यांपैकी एक अंगठी. चांदीची अंगठी मोठ्या प्रमाणात मुलींच्या हाताच्या करंगळी मध्ये दिसते. ही अंगठी करंगळी मध्येच का घातली जात असेल असा प्रश्न देखील तुम्हाला पडत असेल. तर आज आपण याबद्दल कारण जाणून घेणार आहोत.

   

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) चांदीची अंगठी परिधान करणे हे सुंदरता वाढवण्यासाठीच नाही तर सुख आणि समृद्धी साठी देखील वापरण्यात येतात. त्याचप्रकारे चांदीचे दागिने घातल्यामुळे शरीरातील पाणी आणि कफ नियंत्रित राहतो. त्याचप्रकारे चांदीच्या अंगठीचे आणि दागिन्यांचे वेगवेगळे फायदे देखील आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार चांदी नऊ ग्रहांपैकी शुक्र आणि चंद्राच्या संबंधित धातू आहे. चांदीची उत्पत्ती शंकराच्या डोळ्यातून झाल्याचं देखील म्हटल्या जातं. त्यामुळे जिथे चांदी आहे तिथे ऐश्वर्य आणि समृद्धीची कमतरता भासत नाही.

चांदीची अंगठी घालण्यापूर्वी हे करा-

तुम्ही बाजारात जाऊन आवडेल अशी डिझाईनची चांदीची अंगठी घेऊन या. त्यानंतर गुरुवारी रात्री पाण्यामध्ये ठेवा. सकाळी उठून ही अंगठी भगवान विष्णूच्या चरणी ठेवा. आणि पूर्ण विधीनुसार पूजा करा. तुमची पूजा पूर्ण झाल्यानंतर अंगठीला चंदन लावून धूप दीप दाखवून अक्षदा अर्पण करा. यानंतर उजव्या हाताच्या करंगळी मध्ये ही अंगठी तुम्ही घालू शकतात.

हे आहेत चांदीच्या अंगुठीचे फायदे- (Astrology)

  1. उजव्या हाताच्या करंगळी मध्ये चांदीची अंगठी घातल्यास त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि सुंदरतेवर देखील पडतो. यामुळे चांदीची अंगठी घातल्यास शुक्र ग्रह आणि चंद्र शुभ फळ देतात. त्यामुळे सौंदर्य अजून खुलते. आणि चेहऱ्यावरील डाग देखील गायब होतात.
  2. चांदीच्या अंगठीचा परिणाम मानसिकतेवर, मनाच्या शांती वर देखील मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर उजव्या हाताच्या करंगळी मध्ये अंगठी परिधान केल्यास मेंदू शांत राहतो. आणि महत्वाचं म्हणजे कोणाच्याही बोलण्याचा राग येत नाही. म्हणजेच रागावर नियंत्रण राहते.
  3. एखाद्या व्यक्ती मध्ये मानसिक क्षमता कमी असल्यास चांदीच्या अंगठी चा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसतो. उजव्या हाताच्या करंगळी मध्ये अंगठी परिधान केल्यास ही अंगुठी चंद्राला बळ देऊन मानसिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करते.
  4. जर तुम्हाला सतत कफ सांधेदुखी आणि हाडांच्या संबंधित समस्या असतील तर चांदीच्या अंगठीचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
  5. बऱ्याच लोकांना अंगठी घालणे आवडत नसते त्यांच्यासाठी चांदीची चैन हा चांगला उपाय आहे. यामुळे शरीरातील वात, कफ आणि पित्त यांचा समतोल राखल्या जातो.
  6. जर तुम्हाला बोलताना त्रास होत असेल किंवा तुम्ही अडखळत असाल तर चांदीची अंगठी किंवा चांदीची चैन याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.