टाइम्स मराठी । हिंदू धर्मात कोणताही सण (Astrology) असल्यास किंवा कोणतीही पूजा करताना वेगवेगळे साहित्य मागवल्या जातं. या पूजेच्या साहित्यामध्ये नारळ हे महत्त्वाचे मानले जाते. शुभ कार्य असो किंवा कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. हिंदू धर्मात हे नारळ पवित्र मानले जाते. कारण देवी देवतांना नारळ अर्पण केल्यावर सर्व दुःख नष्ट होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होते. तर आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिष शास्त्रानुसार नारळाचे महत्त्व…
ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) नारळामध्ये भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारळाचे झाड आणि कामधेनु पृथ्वीवर आणले होते. भगवान शंकराला देखील नारळ प्रिय होते. तुम्ही बऱ्याचदा नारळावर तीन डोळे पाहिले असतील. या तीन डोळ्याची तुलना भगवान शिवशंकरांच्या त्रिनेत्रांशी केली जाते. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतीक असल्याचे देखील मानलं जातं. यासोबत शास्त्रात दिल्याप्रमाणे नारळाचं पाणी घरामध्ये शिंपडल्यास सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात.
नारळ फोडण्यामागील पौराणिक कथा – (Astrology)
हिंदू धर्मामध्ये (Astrology) कोणत्याही शुभकार्यासाठी नारळ फोडणे हे शुभ मानले जाते. याच्यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. एकदा ऋषी विश्वमित्र हे इंद्रदेवांवर नाराज होऊन त्यांनी दुसरा स्वर्ग निर्माण करण्यासाठी सुरुवात केली. पण या स्वर्गाच्या निर्मिती बद्दल ते असमाधानी होते. मग त्यांनी संपूर्ण सृष्टीलाच बनवण्याचा निर्णय घेतला. दुसरं जग निर्माण करत असताना माणसाच्या रूपात नारळ निर्माण केलं. म्हणून नारळाच्या शेंड्याला बाहेरून दोन डोळे आणि एक मुख दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी हिंदू धर्मामध्ये मानव आणि प्राण्यांचा बळी दिला जात होता. ही प्रथा मोडण्यासाठी माणसांच्या जागी नारळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. त्यानुसारच पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःला आपल्या आवडत्या देवतेच्या चरणी वाहने होय. यासाठी शुभकार्यात किंवा कोणत्याही पूजेमध्ये नारळ आवश्यक आहे.
महिलांनी नारळ का फोडू नये ?
हिंदू धर्मामध्ये महिलांच्या हातातून नारळ फोडल्या जात नाही कारण नारळ हे एक बीज फळ आहे. आणि महिला बीज रूपातच संतान ला जन्म देते. त्याचबरोबर नारळ हे गर्भधारणेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम देखील मानला जातो. त्यामुळेच महिलांनी कधीच नारळ फोडू नये असं सांगण्यात येतं. आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामनांसह पुत्रिक जोडप्याला पुत्रप्राप्ती देखील होते.