चंद्रावर कशी असते अंतराळवीरांची लाईफस्टाईल? वाचून तुम्हीही व्हाल थक्क

टाइम्स मराठी । सध्या चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही भारताची तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशातच नागरिकांच्या मनामध्ये चांद्रयानाबाबत किंवा अंतराळबाबत वेगवेगळे प्रश्न येत असतात. यासोबतच अंतराळात जाण्याऱ्या अंतराळवीरांचा विचार केला तर आपल्याला पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये काही लोक दिसतात. म्हणजेच आपल्यासमोर पांढराशुभ्र अंतरिक्ष यानातला ड्रेस घातलेला व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो. या सोबतच आपल्या मनात त्यांची लाईफस्टाईल कशी असेल हा प्रश्न निर्माण होतो. पृथ्वीवरच्या लोकांची लाईफस्टाईल असते त्याप्रकारे ऍस्ट्रोनॉट हे देखील जगत असतील का असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. त्यांची अंतराळात लाईफस्टाईल कशी असेल हे आपण जाणून घेणार आहोत.

   

पृथ्वीवर आपल्याला ज्या प्रकारे ऑक्सीजन मिळतो त्या प्रकारे अंतराळात मिळत नाही. अंतराळात झिरो ग्रॅव्हिटी असल्यामुळे ऍस्ट्रोनॉट जमिनीवर पाय देखील ठेवू शकत नाही. ते हवेमध्ये तरंगतात. त्या ठिकाणी वातावरण वेगळे असल्यामुळे अंतराळात जाण्यासाठी लोकांना स्पेशल ट्रेनिंग दिले जाते. अंतराळात प्रत्येक गोष्ट वेगळी असल्यामुळे त्या ठिकाणी लाईफस्टाईल देखील वेगळी आहे. अंतराळात ऍस्ट्रोनॉटला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ब्रह्मांड मध्ये असलेल्या रेडिएशन चा वाईट असर त्यांच्या बॉडीवर पडत असतो. त्यामुळे अंतराळात राहणे अशक्य आहे.

थर्मोस्टेबलाइज फूड

पृथ्वीवर ज्या प्रकारे आपण जमिनीवर बसून जेवण करतो, त्याप्रकारे अंतराळात जेवण करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी खाद्यपदार्थ खात नाहीत. अंतराळात प्रवास करणाऱ्या ऍस्ट्रोनॉट साठी थर्मोस्टेबलाइज फूड हे जेवणाच्या रुपात दिले जातात. यासोबतच पिण्यासाठी स्पेशल पावडर वापरली जाते. तसेच आरोग्यासाठी नट्स सारखे काही पदार्थ देखील ते खातात. ऍस्ट्रोनॉटला आपल्या प्रमाणे पोटभर जेवण करता येत नाही. त्यांना कमी जेवण करावे लागते.

स्पेस वॉक

अंतराळामध्ये झिरो ग्रॅव्हिटी असल्यामुळे जमिनीवर किंवा पृष्ठभागावर अंतराळवीर उभे राहू शकत नाही. जेव्हा त्यांना रॉकेटमधून बाहेर पडून काही काम करायचे असते तेव्हा त्यांना स्पेस सूट घालून सेफ्टी फीचर्स च्या माध्यमातून बांधून काम करावे लागते. त्याचबरोबर स्पेस वॉक साठी ऍस्ट्रोनॉटच्या स्पेस सूटमध्ये एक छोटे प्रॉपुलिज्सम सिस्टम देण्यात आलेले असते. त्यानुसार स्पेस वॉक केलंजातो. प्रॉपुलिज्सम सिस्टम लाईव्ह जॅकेट प्रमाणे काम करते. हा सूट वापरून अंतराळवीर अंतराळात कुठेही फिरू शकतात.

अंतराळात अशा प्रकारे असते टॉयलेट सुविधा

अंतराळामध्ये ऍस्ट्रोनॉटसाठी वॉशरूमची सुविधा कशाप्रकारे असेल किंवा ते वॉशरूम जाण्याचा त्याग करत असेल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु स्पेसमध्ये नॉर्मल टॉयलेट असते. या ठिकाणी हाय व्हॅक्युम क्लिनर लावलेले असतात. त्यानुसार विस्टा स्पीड मध्ये व्हॅक्युम क्लिनरच्या सहाय्याने बाहेर फेकली जाते.