ASUS ROG Flow X13 : ASUS ने लाँच केला नवा Laptop; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । लॅपटॉप निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ASUS कंपनीचे अप्रतिम लॅपटॉप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता ASUS ने नवीन  लॅपटॉप लॉन्च केला आहे. लॉन्च करण्यात आलेला हा लॅपटॉप  ASUS ROG Flow X13 या मॉडेलचे व्हेरियंट असून हा लॅपटॉप भारतात ASUS इंडिया वेबसाईट वरून खरेदी करता येऊ शकतो. कंपनीने हा लॅपटॉप दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध केला आहे. त्यानुसार ASUS ROG Flow X13 या व्हेरिएंट ची किंमत 1 लाख 74 हजार 990 रुपये आहे. आणि  लॅपटॉपच्या दुसऱ्या व्हेरिएंट ची किंमत 1 लाख 84 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. जाणून घेऊया या लॅपटॉपचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन– ASUS ROG Flow X13

ASUS ROG Flow X13 या लॅपटॉप मध्ये 13.4 इंच IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 165 hz रिफ्रेश रेट सह  QHD+ रिझोल्युशन ऑफर करतो. लॅपटॉप मध्ये देण्यात आलेला डिस्प्ले हा 500 निट्स ब्राईटनेस, 3ms रिस्पॉन्स टाईम सह येतो. या लॅपटॉप मध्ये AMD RYZEN 9 7940HS प्रोसेसर देण्यात आले आहे. ASUS च्या या नव्या लॅपटॉप ला  GeForce RTX 4050 किंवा RTX 4060 GPU सोबत कॉन्फिगरेशन करण्यात येऊ शकते.  या लॉन्च करण्यात आलेल्या  व्हेरियंटमध्ये 16 GB रॅम आणि 1 TB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच लॅपटॉप मध्ये बॅकलिट चिकलेट कीबोर्ड देखील उपलब्ध आहे.

फिचर्स

ASUS ROG Flow X13 या लॅपटॉप मध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये WIFI , FHD कॅमेरा, ब्लूटूथ, बॅटरी 3.5m ऑडिओ जॅक यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहे. एवढेच नाही तर  HDMI 2.1 PORT, यूएसबी  3.2 GEN 2 TYPE C PORT, ROG XG मोबाईल इंटरफेस, USB TYPE C कॉम्बो पोर्ट, टाईप सी यूएसबी 4 पोर्ट, आणि कार्ड रीडर देखील देण्यात आले आहे.